-गडचिरोलीच्या शिरपेचात मनाचा तुरा
The गडविश्व
गडचिरोली, १७ फेब्रुवारी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर व चंद्रपूर यांच्या वतीने १४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली यांच्या राज्य स्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत गडचिरोली बॉक्सिंग केंद्राच्या खेळाडूंनी चमकदार प्रदर्शन करत एकूण ६ पदके मिळवली.
या स्पर्धेत देवांग महागणकर याला सुवर्ण तर शिवलीका विषनोई, भैरवी भरडकर, रितेश करंगामी यांनी रजत पदक तर मनस्वी कांचीनवार, रमण मसराम यांनी कांस्य पदक पटकाविले तर नैतीक आवारी, ओम कुमरे, विराज वैरागडे यांचा सहभाग राहिला.
त्यांच्या या यशाबद्दल बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जगदीश म्हस्के, सचिव यशवंत कुरुडकर जिल्हा क्रीड अधिकारी प्रशांत दोंदल, कुस्ती प्रशिक्षक बडगेलवार, रोहित वैष्णोई आदिनी शुभेच्छा दिल्या
सदर खेळाडू गडचिरोली बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनात यशस्वी सराव करीत आहेत सदर खेळाडू केंद्राचे नियमित खेळाडू असून त्यांना बॉक्सिंग प्रशिक्षक महेश निलेकार, पंकज मडावी, संतोष गैनवार, र देशमुख, निखिल इंगडे, प्रवीण मेश्राम, सुरज खोब्रागडे, संजय मानकर सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Gadchiroli Boxing) (The Gdv)