अत्याधुनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची उभारणी करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

27

– आरोग्य सेवेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवा
The गडविश्व
मुंबई,दि.२६ : राज्यातील नागरिकांना किमान ५ किमीच्या आतमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत.सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना करून पायाभूत सुविधा अत्याधुनिक दर्जाच्या उभाराव्या तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजनांचा ५० टक्के पेक्षा जास्त वापर राज्यातील करावा यावर भर देण्यात यावा.तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर आपल्या राज्यात १३ आरोग्य सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध कराव्यात.आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त योजना व आरोग्य सुविधा ऑनलाईन करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर,आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातील अंतर्गत कामकाजात सुसूत्रीकरण करा.ज्या गोष्टी कालबाह्य झाल्या असतील तिथे सुधारणा करा. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतच उपचार जास्तीत जास्त मिळतील यासाठी प्रयत्न करा.प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये सामान्य आजार, संसर्गजन्य रोग, गरोदरपण, कुटुंब नियोजन, बाल व किशोर या आरोग्य सेवा सुधारण्यावर भर देणे गरजेचे आहे.तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर १३ आरोग्य सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध कराव्यात. नागरीकांना आरोग्य सेवा सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळाव्यात यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. यंत्रणांनी सर्व अभ्यास करून याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसमावेश माहिती लवकरात लवकर सादर करावी. तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढवणे, आरोग्य विभागात नवीन सुविधा सुरू करणे.जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांचे आधुनिकीकरण करा.ग्रामीण भागात जिथे आरोग्य सुविधा नाहीत तिथे आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्यात यावीत याबाबत गतीने कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औषध पुरवठा व उपकरण व्यवस्थापन सुधारणा.आरोग्य सेवेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे.आयुष्मान भारत व राज्य सरकारच्या विमा योजनांतर्गत सरकारी व खासगी रुग्णालयांची संख्या वाढवणे.उपचारांचा खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर उपाय.ग्रामीण व दुर्गम भागातील सुधारणांवर भर देवून आदिवासी व दुर्गम भागांत विशेष आरोग्य केंद्रे. मोबाईल हेल्थ युनिट्स आणि टेलीमेडिसिनचा विस्तार करा.स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून आरोग्य सेवा पोहोचवा.खाजगी रुग्णालयांवरील नियम काटेकोर करून करा.नागरिकांसाठी आरोग्य शिक्षण आणि जनजागृती मोहीमा राबवा. आरोग्य विभागाच्या डेटा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा अशा सूचना त्यांनी केल्या.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे डॉ.सचिव निपुण विनायक,सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी तामिळनाडू येथील आरोग्य यंत्रणेला भेट देवून आल्यानंतर तेथील अभ्यास दौरा अहवाल.राज्यातील आरोग्य विभागातील सुधारणाची माहितीचे सादरीकरण केले.
यावेळी या बैठकीला अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा,मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,अपर मुख्य सचिव वैद्यकीय शिक्षण धीरज कुमार, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी,सार्वजनिक आरोग्य विभागाचे डॉ.सचिव निपुण विनायक,सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर,राष्ट्रीय आरोग्य मिशनचे आयुक्त अमेगोथु नायक हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here