The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.११ : राज्याचे प्रधान सचिव तथा ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी रविवार रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष कुरखेडा अंतर्गत शक्ती प्रभागसंघ पुराडा येथे क्षेत्रभेट दिली. या क्षेत्रभेटी दरम्यान प्रधान सचिवानी
विविध उपजीविकेची स्त्रोत यांची पाहणी केली. ज्यामध्ये सेंद्रिय शेती, PG, OSF, CIF , बँक कर्जातून मधून तयार झालेले उद्योग, प्रक्रिया केंद्र तसेच प्रभाग संघातील महिलांसोबत चर्चा केली ज्यामध्ये CMTC, जांबुळ, सीताफळ व आंबाळी प्रक्रिया केंद्रावर सुद्धा भेट झाली.सोबतच कच्चा माल इथेच तयार करण्याच्या दृष्टीने झाळांची लावगड कशी करता येईल यावर त्यानी मार्गदर्शन केले व प्रभाग संघ भविष्यामध्ये स्वतःच्या पायावर कसा उभा राहील याबद्दल चर्चा करण्यात आली. त्यानंतर जांभुळखेडा या गावांमध्ये चारोळी प्रक्रिया केंद्रावर सुद्धा भेट देण्यात आली. स्थानिक पातळीवरील कच्च्या मालावर प्रक्रिया करुन व्यवसाय कसा मोठा करता येईल याबाबत त्यानी मार्गदर्शन केले. तसेच मालदुगी या गावांमध्ये मध संकलन व प्रक्रिया केंद्र येथे भेट देण्यात आली. ज्यामध्ये मध गावातच कसा तयार करता येईल व त्याकरीता प्रशिक्षण कसे आयोजीत करता येइल याबाबत त्यानी मार्गदर्शन केले. सोबतच वैयक्तिक उद्योग यांना सुद्धा भेट देऊन महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून उत्पन्नाचे स्त्रोत कसे वाढवता येईल आणि प्रत्येक महिलेला लखपती दीदी कसं बनवता येईल हा दृष्टिकोन समोर ठेवून महिलांना मार्गदर्शन केले. तसेच गडचिरोली जिल्ह्यात महिला सक्षमीकरण कामाबद्दल प्रशंसा केली.
याप्रसंगी उपस्थित जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आयुशी सिंह, उद्योग विकास विभागाचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, डि.आर.डि.ए चे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.