धानोरा येथील व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे तहसीलदार यांना निवेदन

191

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २९ : धानोरा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे तहसीलदार धानोरा कु. ए.बी. लोखंडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले.
मुल येथील दैनिक पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संजय रघुनाथ पडोळे यांना वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केल्याचे कारणावरून काँग्रेस नेते प्रकाश मुरलीधर मारकवार यांनी भ्रमणध्वनीय द्वारे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी संजय पडोळे यांनी पोलिसात तक्रार दिली असून कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याने प्रकाश मारकवार यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करीत व्हॉईस ऑफ मीडिया धानोरा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदवित आहे.
काँग्रेस नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे यांना दिलेली धमकी ही वृत्तपत्र स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी असून पत्रकार आणि वृत्तपत्राचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी असल्याचे दिसून येते त्यामुळे सदर नेत्याकडून झालेल्या बेकायदेशीर कृत्याचे आम्ही व्हॉईस ऑफ मीडिया धानोरा तालुक्यातील सर्व पत्रकार जाहीर निषेध नोंदविल आहे, सोबत काँग्रेस नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे यांना मारण्याच्या दिलेल्या धमकीमुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची नोंद करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडिया तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली करीत आहे.
निवेदन देताना धानोरा तालुका अध्यक्ष वाईस ऑफ मीडिया तथा जिल्हा उपाध्यक्ष शरीफ कुरेशी, भाविकदास करमणकर, तालुका उपाध्यक्ष दिवाकर भोयर, तालुका कार्याध्यक्ष देवराव कुनघाटकर, सिताराम बडोदे, श्रावण देशपांडे, बंडू हरणे, ओम देशमुख, तुफान उंदीरवाडे, बाळकृष्ण बोरकर, मारुती भैसारे, अभय इंदुरकर, सुरेश शिरसागर इत्यादी धानोरा तालुका चे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.

(#dhanora #thegdv #thegadvishva #gadchirolinews #voice of media )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here