प्रत्येक क्षेत्रात आदिवासी बांधव पुढे गेला पाहिजे त्या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न करा

200

– माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन
The गडविश्व
ता. प्र / अहेरी, दि.११ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक मूलमंत्र सांगीतला आहे,शिका संघटीत व्हा संघर्ष करा त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात आदिवासी बांधव पुढे गेला पाहिजे त्या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न करा असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. ते अहेरी आगारात व आलापल्ली आणि तलवाडा येथील साजरा केलेल्या जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात बोलत होते.
९ ऑगस्ट रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी साजरा करण्यात आला. अहेरी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक अहेरी आगारात आणि आलापल्ली, तलवाडासह विविध ठिकाणी आदिवासी दिन मोठ्या उत्साहात पार पाडले. या कार्यक्रमात काँग्रेस नेते माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार व आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मडावी यांनी आपली उद्बोधनात म्हंटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटीत व्हा संघर्ष करा असा मूलमंत्र दिली आहे त्याप्रमाणे आदिवासी बांधव प्रत्येक क्षेत्रात पुढे गेला पाहिजे त्या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. मात्र काही लोकं आपल्या आदिवासी समाजमध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांनी वज्रमुठ बांधण्याची गरज आहे. राजकारणात समाजातील नागरीक कोणत्याही पक्षात असतात पण राजकारणात आपण कितीही विरोधक असलो तरी समाजासाठी मात्र एकत्र येणे ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे समाजाच्या कार्यक्रमात राजकारण न करता समाजहिताचे काम करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेससेल जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य, अहेरीचे नगरसेवक, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्या सह स्थानिक कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #tanushri atram #tanushri dharmrawbaba atram #gadchirolilocalnews #कुरखेडा #kurkheda #Dhanora #Diwakar Bhoyar Dhanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here