– तालुक्यातून लगाम जिप शाळा प्रथम
The गडविश्व
गडचिरोली, ५ मार्च : मूलचेरा येथील गटसाधन केंद्रात दारू व तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रकल्पातून तंबाखूमुक्त शाळेची संकल्पना मांडली.
या स्पर्धेमध्ये जिप शाळा आंबटपल्ली, लक्ष्मीपूर, मथुरानगर, अडपल्ली चक, लगाम, देशबंधुग्राम आदी जिप शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये तंबाखूमुक्त शाळेसंदर्भात उत्कृष्ठ प्रकल्प ठरलेल्या लगाम जिप उच्च प्राथमिक शाळेला प्रथम तर मथुरानगर जिप शाळेला द्वितीय क्रमांक देण्यात आला. हा कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी गौतम मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. निरीक्षक म्हणून डॉ.एस.इन.महाकरकार, एस.एन. कुटे, विषय साधन व्यक्ती भोयर यांनी काम बघितले. यावेळी फुलोरा समन्वयक एम.एल.मडावी, एम.डी.सातपुते, दिवाकर मादेशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, नम्रता मेश्राम यांनी केले.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (The Gdv) (IND vs AUS) (Juventus vs Torino) (Jungkook) (Man United vs West Ham) (Justin Bieberl)