The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०८ : तालुक्यातील सावरगाव आश्रम शाळेत परिसरातील आदिवासी समाजाचे एकूण २४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध समस्याचा सामना करावा लागत आहे तरी संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन येथील समस्या सोडविण्याची मागणी पालकांनी केली आहे.
धानोरा तालुक्या पासुन ४० कि.मी.अंतरावर असलेल्या सावरगाव येथे आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत आश्रम शाळा असुन त्यात १२७ मुली आणि १४० मुले शिक्षण घेत आहेत. निवासासह ते रहातात मात्र पत्रकार प्रतिनिधींनी शाळेला भेट दिली असता शाळेतील मुला-मुलींना विविध समस्या भेडसावत असल्याचे आढळून आहे . तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आणि जंगलग्रस्त भाग असल्याने सर्वात मोठी समस्या लाईटची आहे. पुर्णवेळ लाईट कधीच नसते त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जनरेटरची नितांत गरज असतानाही विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. लाईट नाही तर विद्यार्थी अभ्यास कसे करणार , दोन दोन दिवस लाईट राहत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागते.
मुला-मुलींना आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याची सोय नाही. त्यामुळे थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. लाईट राहात नाही त्यामुळे मोटार पंप बंद असते, त्यामुळे वेळोवेळी आंघोळीसाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाण्याच्या समस्याचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे. त्यासाठी हँड पंप ची सोय करण्यात यावी. शेवटच्या टोकावर असल्याने बस नियमित येत नाही अशा अनेक समस्याचा सामना सावरगाव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी करताना दिसून आले आहे. सबंधित विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी काढावे अशी मागणी होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #gadchirolipolice )