विद्यार्थ्यांनी गणिताचे सारथी बनावे : प्रशांत साळवे

354

The गडविश्व
ता.प्र / धानोरा,२३ डिसेंबर : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथे “थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन ” यांची जयंती २१ डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली. यावेळी मानवाच्या विकासासाठी गणीताचे महत्वशालेय विद्यार्थांनी समजुन घ्यावे आणि रामानुजन यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी , गणिताविषयी आवड निर्माण होवून, विद्यार्थ्यांनी गणिताचे सारथी बनावे असे प्रतिपादन प्रशांत साळवे गणित शिक्षक यांनी केले ते “राष्ट्रीय गणित दिन”. कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरुण बोलत होते. प्रमुख अतिथी डॉ.रश्मी डोके, कु.रजनी मडावी, एस.एम.रत्नागिरी, विजय बुरमवार, मोहन देवकाते, स्नेहा हेमके, रेखा कोरेवार, संगीता निनावे, ओम देशमुख, किरण दरडे होते. याप्रसंगी गणित शिक्षक साळवे यांनी श्रीनिवास रामानुजन यांचे जीवनावर माहिती देत विद्यार्थ्याना दैंनदिन जीवनात गणिताचे महत्व पटवून दिले. गणित विषय हा मनोरंजनच्या माध्यमातून शिकवून गणितविषयी गोडी निर्माण करण्याचे आवाहन केले. महाभारतातील युद्धातील कृष्ण अर्जुन यांची कथा सांगत गणितीय प्रश्नमंजुषा घेत विद्यार्थ्याना गणिताचे सारथी बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रशांत तोटावार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु.श्रेया मोहूर्ले, कु.सायली सहारे, कु. जासू मैंद, बादल वरघंटीवार, जयराम कोरेटी, भालचंद्र कोटगले आणि वर्ग १० अ च्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Students should become charioteers of mathematics)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here