– सहायक जिल्हाधिकारी तथा तालुका उपविभागीय अधिकारी रंजीत यादव यांचे प्रतिपदान
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २९ : विद्यार्थी दशेत जीवन जगताना विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न बघून ते स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर जीवनात यश संपादन करून एक मोठे अधिकारी बनता येते त्याकरिता विद्यार्थ्यानी निरंतर वाचनाची गोडी निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय तालुका अधिकारी रणजीत यादव यांनी केले.
ते कुरखेडा येथे आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा द्वारा संचालित संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुरखेडा तथा श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय तथा वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कला संस्कार वार्षिक महोत्सवाच्या समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
यावेळी अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य धर्मेंद्र मुनघाटे, प्रमुख अतिथी अध्यक्ष म्हणून शाळा समिती अध्यक्ष तथा विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्याध्यक्ष वामनराव फाये संस्था सचिव दोषहर फाये, सेवानिवत्त प्राचार्य देवराव गजभिये , लीलाधर बडवाईक श्यामराव सोनुले, बस आगार प्रमुख श्रीधर शिवणकर , सेवानिवृत्त नायब तहसिलदार कावळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक,दखणे, पुंडलिक नागपूरकर महाराज, पुंडलिक नेबारे महाराज,शोभा लाकडे,टिकाराम डोंगरवार , नरेश गायकवाड, मनीषा कूळमेथे, संदेपाल, लाडे,व विद्यार्थी प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी रंजीत यादव यांनी विद्यार्थ्यांन सोबत चर्चा करून त्यांच्या मनातील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली व स्पर्धा परीक्षा संदर्भात स्वतःचा अनुभव सांगितला.
यावेळी धर्मेंद्र मुनघाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हंटले की विध्यार्थीनी कला, साहित्य व क्रिडा सेत्रात सहभाग घेऊन गुणवंत, चारित्र्यवान विद्यार्थी बनावे.
यावेळी गुणवंत विद्यार्थी व क्रिडा स्पर्धात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्याचां शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांननी स्वागत झाकीच्या माध्यमातून मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा समिती सदस्य चांगदेव फाये यांनी केले तर सूत्रसंचालन सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. विनोद नागपूरकर यांनी केले यांनी केले अहवाल वाचन प्राचार्य, नागेश्वर फाये यांनी केले व आभार प्रा. प्रदीप पाटणकर यांनी मानले.
यावेळी आयोजित विविध स्पर्धात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कला संस्कार वार्षिक महोत्सवाचा समारोप व व बक्षीस वितरण समारंभ सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेष सहकार्य केले.
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)