दखणे विद्यालय मुरुमगाव चे सुयश : एसएससी परीक्षेचा निकाल ९१ टक्के

165

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २९ : तालुक्यातील मुरुमगाव येथील के .आर. दखणे .आदिवासी विकास शिक्षण संस्था मुरूमगाव, द्वारा संचालित स्व .रामचंद्रजी दखणे विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल ९१ टक्के लागला आहे. परीक्षेला प्रविष्ट एकूण २३ विद्यार्थ्यापैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात प्रथम श्रेणीत १३ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ७ विद्यार्थी, तृतीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला.
प्रथम श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी दिक्षा मदनलाल मलिया हिने ८५ टक्के गुण मिळवत शाळेतून अव्वल स्थान पटकाविले, कुमारी सलेहा नईम शेख ८३ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला, कुमारी मीनाक्षी तुलाराम भैसारा ८२ टक्के गुण प्राप्त झाले असून ती तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. प्रथम श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ओम .एस. बघेल ८१ टक्के ,कुमारी शालिनी. एस .भोयर ८१ टक्के, मोहम्मद मुज्जमिल मोहम्मद शरीफ कुरेशी ७७ टक्के, कुमारी रानी पाऊल बुरेवार ७५ टक्के, कुमारी कल्पन सी देहरी ७३ टक्के, राजकुमार .एफ. फाफामारिया ६४ टक्के, कुमारी चांदनी जी मडावी ६२ टक्के, रुपेश झेड नैताम ६१ टक्के, प्रियंका एस झोका ६० टक्के, नरेंद्र .एन. नैताम ६० टक्के असे एकुण १३ विद्यार्थी प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष कमलाबाई दखणे संस्था सचिव महेंद्रजी दखणे कोषाध्यक्ष करीमाताई देवानी, संस्था सदस्य रेखाताई मेशकर, जिजाताई कवाडकर, मंगलाताई उईके, हरिरमजी कावाडकर, कृपारामजी भूर्कुरिया, मुख्याध्यापक महेंद्र जांभुळकर यांनी अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाची श्रेय वर्गशिक्षक बाळकृष्ण बोरकर, भास्कर मेश्राम, घनश्याम चिंचोलकर, सतीश सुरणकर, संतोष देशमुख, विलास चौधरी, रमेश निसार, रामाधर राणा, सुरेश तुलावी आदींना दिले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #ssc result2024 #dhanora #murumgao #dakhanevidyalay)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here