– सर्व्हिस पिस्तूलने स्वतःवर झाडली गोळी
The गडविश्व
चेन्नई, ७ जुलै : तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी डीआयजी विजय कुमार यांनी आपल्या सर्व्हिस पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आयपीएस अधिकारी विजय कुमार यांनी स्वत:वर गोळी का झाडली? हे अद्याप समजू शकले नाही.
विजयकुमार यांनी कांचीपुरम, कुड्डालोर, नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले होते अशी माहिती आहे. याच वर्षी, विजयकुमार यांनी कोईम्बतूर रेंजचे नवीन पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून पदभार स्वीकारला तर याआधी त्यांची शेवटची पोस्टिंग चेन्नई येथे होती, जिथे त्यांनी पोलीस उपायुक्त म्हणून काम केले. 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विजयकुमार यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम केल आहे.
आता ज्या कोइम्बतूर रेंजमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामध्ये कोईम्बतूर ग्रामीण, तिरुपूर ग्रामीण, निलगिरी आणि इरोड जिल्ह्यांचा समावेश आहे.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार विजयकुमार हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले आणि 6.45 च्या सुमारास त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये आले. त्यांनी त्याच्या सुरक्षा अधिकाऱ्याला (पीएसओ) आपले पिस्तूल देण्यास सांगितलेया आणि पिस्तून घेऊन ते कार्यालयातून बाहेर पडले. सकाळी 6.50 च्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.