सुमेधा इन्सिटयुट गडचिरोलीच्या अबॅकसच्या विद्यार्थ्यांची गगनभरारी

148

– सातव्या आंतरराश्ट्रीय स्पर्धेत विर्थ्यांर्थ्यांचे सुयश
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : सातव्या आंतरराज्य व १४ वा राज्यस्तरीय अबॅकसची स्पर्धा नुकतीच २९ डिसेंबर २०२४ रोजी पार पडली. या स्पर्धेमध्ये गडचिरोली येथील सुमेधा इन्सिटयुट च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून पदक प्राप्त करीत गगनभरारी घेतली आहे आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगीरीने गडचिरोली जिल्हयाची मान आणखी उंचावली गेली आहे.
सदर पार पडलेल्या स्पधेमध्ये अवघ्या पाच मिनीटात १०० गणित सोडविण्याची स्पर्धा घेतली जाते. सदर स्पर्धेत आंतरराज्य स्तरावरील साऊथ आफ्रिका, अबुधाबी, श्रीलंका,जपान, ऑस्ट्रेलिया, दुबई, नॅदरलॅंड या देशातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करून गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी सन्मान पदक प्राप्त केले आहे. या स्पर्धेमध्ये सुमित मनोज मडावी, शिवांश दिनेशकुमार वरखेडे, कस्तुंभ डॉ. वैभव तातावार, अश्रेय शंकर पुंगाटी, सानिध्य नितिनराव बटृटुवार, स्पर्श अरूण सातपुते, सन्मीत विद्यानंद चहांदे, जिशा चंदु वाघाडे, अध्ययणी किषोर मडावी, वनश्री मनोज जाधव, स्वरांजली श्रीनिवास दुल्लमवार, राधिका समिर कटकमवार, ओजस डॉ. प्रशांत पेंदाम, सानवी आशुतोश गादेवार यांनी सहभाग घेतला होता.
गडचिरोली येथील सुमेधा इन्सिटयुट च्या माध्यमातुन २०१८ पासून ते २०२४ अखेर पर्यंत ३ वेळा राज्यस्तरीय व आंतरराज्यीय स्तरावरील विद्यार्थ्यांना पोहचविण्यात यश प्राप्त केले आहे.
सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यषाचे श्रेय शिक्षक व सहाय्यक षिक्षक कुमारी सुमेधा आर कार्लेकर, लुकेश उमाजी आत्राम, मनीषा इंगळे व आई-वडील यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here