दारूमुक्त निवडणूक व जिल्हा दारूबंदीला समर्थन

57

-उमेदवारांनी दिला वचननामा -मुक्तिपथच्या आवाहनाला प्रतिसाद
The गडविश्व
गडचिरोली,१२ : अहेरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्रीताई आत्राम, अपक्ष उमेदवार अम्ब्रीशराव आत्राम, अपक्ष उमेदवार हनुमंतू मडावी या उमेदवारांनी मुक्तिपथच्या आवाहनाला प्रतिसाद देत होणारी विधानसभेची निवडणूक दारूमुक्त व्हावी, सोबतच गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदीला आमचे समर्थन आहे, असा वचननामा दिला आहे.
निवडणुकीत मी व माझा पक्ष मते मिळवण्यासाठी दारूचा वापर करणार नाही. मी गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचे समर्थन करतो. या निवडणुकीत निवडून आल्यास अथवा न आल्यास जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन. असे वचननाम्यामध्ये या सर्व उमेदवारांनी वचन दिले आहे. भाग्यश्रीताई आत्राम, हनुमंतू मडावी या उमेदवारांनी लिखित व रेकोर्डेड तर अम्ब्रीशराव आत्राम यांनी लिखित पद्धतीने वचननामा दिला आहे. जनतेच्या माहिती साठी व निवडणूकी नंतर या नेत्यांना जाब विचारता यावा यासाठी लिखित वचननामा व रेकोर्डेड व्हिडिओ समाज माध्यमामध्ये प्रकाशित केले आहे. निवडणूक नंतर जनतेला वचन पूर्तीचा हिशोब या नेत्यांना मागता येणार आहे. अहेरी मतदार संघातील उर्वरित व इतर दोन मतदार संघातील उमेदवारांचे वचननामे घेणे सुरू आहे. वचननामा द्या, कोणत्याही स्थितीत वचनाचा भंग होऊ देऊ नका, असे आवाहन उमेदवारांना केले जात आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath )

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here