– स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गडचिरोली येथे मान्यवरांचे शुभहस्ते पुरस्कार प्रदान
The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण 2012 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनलाय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा राज्याचे युवा धोरण 2012 अन्वये 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील युवकांनी व संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रतीवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने देण्यात येतो. जिल्हा युवा पुरस्कार निवड समिती, गडचिरोली मार्फत सन 2021-22 या वर्षाकरीता सुरज प्रभाकर चौधरी (युवक) करीता व कु. रश्मी वसंत वाळके ( युवती ) करीता या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आलेली आहे.
पुरस्काराचे स्वरूप
या पुरस्काराचे स्वरुप युवक करीता 10 हजार व युवती करीता 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असुन 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र दिनाच्या समारंभा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, गडचिरोली येथे मान्यवरांच्या शुभहस्ते, प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्काराकरिता या कार्यांची दखल
सन 2021-22 यावर्षीच्या “जिल्हा युवा पुरस्कार (युवक)” या पुरस्काराकरीता सुरज प्रभाकर चौधरी यांनी सामाजिक कार्यात शॅडो पंचायत, वनराई बंधारा, वृक्षारोपन, वन सवंवर्धन, जैत विवीधता मार्गदर्शन, पेसा जनजागृती, पथनाटय, महीला सक्षमीकरण शिबीर, मतदार जनगागृती, रक्तदान, आपत्ती व्यवस्थापन जिल्हा राज्यस्तरीय सहभाग, पूरग्रस्त मदत, अंधश्रध्दा निर्मूलन इत्यादी कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होण्याचे दृष्टीने त्यांना “जिल्हा युवा पुरस्कार (युवक)” हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
सन 2021-22 यावर्षीच्या “जिल्हा युवा पुरस्कार (युवती )” या पुरस्काराकरीता कु. रश्मी वसंत वाळके यांनी सामाजिक कार्यात आरोग्य विषयक कार्य, कोरोना योद्धा, कृष्ठरोगीसाठी कार्य, वृक्षारोपन, पर्यावरण जनजागृती, युथ लिडरशिप कार्यक्रम, किशोरवयीन मुलींना समुपदेशन स्वच्छता मोहिम, पोलीओ लसीकरण सर्वेक्षण इत्यादी कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होण्याचे दृष्टीने त्यांना “जिल्हा युवा पुरस्कार ( युवती)” हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.