– “सर्च रुग्णालयात वर्षभर होणार शस्त्रक्रिया शिबीर”
The गडविश्व
गडचिरोली, २८ फेब्रुवारी : आरोग्य सेवा ही आजच्या काळात मूलभूत गरज बनली आहे. याच अनुषंगाने ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी यासाठी ‘सर्च’ दंतेश्वरी दवाखाना चातगाव येथे विविध शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे.
या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या शिबिरासाठी गरजू रुग्णांनी रुग्णालायमध्ये रोज नोंदणी करण्याचे आवाहन सर्च दवाखान्याद्वारे करण्यात येत आहे. यामध्ये लॅप्रोस्कोपीक (दुर्बिणी द्वारे) जनरल शस्त्रक्रिया शिबीर गर्भाशयाचे ऑपरेशन, पित्ताशयाचे खळे, हर्निया, अपेंडिक्स. स्त्री रोग विषयक शस्त्रक्रिया शिबीर गर्भाशय काढणे, गर्भाशयाचे काही भाग काढणे, गर्भपिशवीतील गाठ काढणे, अंडाशयातील गाठी, गर्भाशयतील गोडा काढणे, महिला नसबंदी करणे, कान, नाक व घसा शस्त्रक्रिया शिबीर फुटलेले कान, बहिरेपणा, मानेतील व नाकातील गाठी, कानातून आवाज येणे, नाकाची हडडी वाकडी असणे, कानातून पस येणे,कान दुखणे, कानात सूज येणे, कानामध्ये असामान्य वाढ, वय वाढल्याने बहिरेपणा, कान व नाकाची ऐलर्जी. मणक्याचे आजाराचे शस्त्रक्रिया शिबीर जुनी कंबरदुखी, कमरेचे दुखणे चालताना पायात उतरणे, पाय ढिले पडणे, मणक्याचे व्यंग असणे, जुनी मान दुखी, मानेचे दुखणे हातात उतरणे. जनरल शस्त्रक्रिया शिबीर गर्भाशयाचे ऑपरेशन, स्तनातील गाठी, हायड्रोसील, हर्निया, मुळव्याध, अंगावरील गाठी, अपेंडिक्स, स्त्री पुरुष कुटुंब नियोजन ऑपेरेशन उघडणे, पित्ताशयाचे खळे. प्लॅस्टिक शस्त्रक्रिया शिबीर दुभंगलेले ओठ, तिरपी मान काखेमधील सूज, जळलेल्या त्वचेचे संकुचन, पुरुषात स्तनाची वाढ, मूत्र उत्सर्ग नलिकेच्या मार्गात खालच्या बाजूला छिद्र असणे. मूत्रविकार शस्त्रक्रिया शिबीर, मूत्रभागाच्या संसर्गावर उपचार, अंडाशयावर सूज, किडनी स्टोन, मूत्राशयात खडे, झोपेत लघवी करणे, मूत्रमार्ग कडक असणे, लघवीमधून रक्तस्त्राव होणे, प्रोस्टेट समस्या, मूत्राशय नियंत्रण समस्या, मूतखडा निदान.
या शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेण्यासाठी अगोदर रुग्णांना दवाखान्यात येऊन नोंदणी व ठरलेल्या दिवसी येऊन आवश्यक पूर्वतपासण्या कराव्या लागेल. तपासणी मधून ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे असे डॉक्टरांना लक्षात येईल अशाच रुग्णांना शस्त्रक्रिया शिबिरामध्ये घेण्यात येणार आहे. ज्या रुग्णांची प्रथम नोंदणी त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील गरजू, गरीब जे संबधित निकष पूर्ण करतील अशा रुग्णांना, शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत राहणार आहे. सदर निर्णय दवाखाना व्यवस्थापन चमू घेईल. गंभीर व महागडे उपचार असलेल्या अशा अनेक आजारावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या भव्य शस्त्रक्रिया शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्च च्या वतीने करण्यात आले आहे.