The गडविश्व
गडचिरोली, ६ एप्रिल : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात २६ ते २९ मार्च २०२३ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. गडचिरोलीसह चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, कांकेर(छत्तीसगढ़) जिल्ह्यातून आलेल्या रुग्णावर या शिबिरात शस्त्रक्रिया करण्यात आली.
सर्चद्वारे २००५ पासून दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्या जाते. गत पाच ते सहा महिन्यातील सर्चमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णापैकी शस्त्रक्रियेची गरज असलेल्यासाठी २६ ते २९ मार्च २०२३ दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात आली. यात गर्भाशयातील अंडाशयाच्या गाठी, शरीरावरील गाठी, अपेंडिक्स,लहान मुलांचे हर्निया-हायड्रोसील ईत्यादी प्रकारच्या ६७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या शस्त्रक्रियेसाठी स्पेशलिस्ट सर्जन डॉ. संजय शिवदे (जनरल सर्जन) सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प पार पाडण्यात आला. सर्चच्या संस्थापक डॉ. राणी बंग व डॉ. संजय शिवदे यांच्या नेतृत्वात सदर शिबीर घेण्यात आले. सर्चच्या रुग्णालय प्रशासकीय चमूने या शिबिराची उत्तम व्यवस्था सांभाळली.
(The Gadvishva) (Gadchiroli Chandrapur Nagpur Bhandara Gondiya Wardha) (‘Yellow’ alert for three days of rain for ‘these’ districts including Gadchiroli)