दहावीच्या परीक्षेत जिल्हा परिषद हायस्कूल धानोराचे सुयश

159

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २ जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर तर्फे आयोजित माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये जिल्हा परीषद हायस्कूल धानोरा ने सुयश संपादन केले आहे. या हायस्कूल ने ऊज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. येथील कुमारी श्रेया महेंद्र मोहूर्ले हिने ८८.६० टक्के गुण प्राप्त करत शाळेतून प्रथम तर कुमारी सायली प्रकाश सहारे हिने ८७.४० टक्के गुण प्राप्त करत द्वितीय, वंशज रवींद्र शिडाम ८५ टक्के गुण प्राप्त करत तृतीय, कुमारी मेघा काशिनाथ मडकाम ८५.६० टक्के, कुमारी मेघा विनोद लेनगुरे ८४.४० टक्के प्राप्त केले आहे. या हायस्कूलचा निकाल ९५.२३ टक्के लागला असून प्रावीण्य श्रेणीत २९, प्रथम श्रेणीत ४५, द्वितीय श्रेणीत ६ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यांचा या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य व्ही.एम.सुरजुसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर खोबरे, गट शिक्षणाधिकारी व्ही.आर. अरवेली, डी. टी. कोहाडे, पी. व्ही.साळवे, पी.बी. तोटावार , कु.रजनी मडावी, डॉ.रश्मी डोके, एस.एम.रत्नागिरी, ए.बी. कोल्हटकर, व्ही.एम. बूरमवार, एम.एल.देवकाते, आर. ए. कोरेवार, कु.किरण दरडे, हरीश पठाण, ओम देशमुख, सहारे सर, श्रीमती चेलमेलवार, श्रीमती जूनघरे, बादल वरघंटीवार, आदींनी अभिनंदन केले आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli dhanora zp school, ssc result2023)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here