The गडविश्व
धानोरा, ९ सप्टेंबर : तालुका स्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा ४ सप्टेंबर पासून चातगाव येथे सुरू आहेत. यामध्ये १७ वर्ष वयोगट व्हॉलीबॉल स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा च्या चमूने मॉडेल स्कूल मोहली चा पराभव करीत प्रथम क्रमांक पटकाविला. यामुळे जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा ची व्हॉलीबॉल चमू जिल्हा क्रीडा स्पर्धा करीता पात्र ठरली आहे.
त्याचप्रमाणे वयोगट १९ वर्ष कब्बडी ची चमू तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावत जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. यशस्वी चमुचे आणि चमुचे प्रशिक्षक पी.बी.तोटावार, ओम देशमुख यांचे गटशिक्षणाधिकारी व्हि.आर.अरवेली, मुख्याध्यापक विजय सूरजुसे, डी. टी. कोहाडे, पी. वी.साळवे, प्रा.रश्मी डोके, एस.एम. रत्नगिरी, कुमारी रजनी मडावी, अशोक कोल्हटकर, मोहन देवकाते, विजय बुरमवार, सहारे, हरीश पठान, बादल वरघंटीवार यांनी अभिनदन केले आहे तसेच जिल्ह्यावर विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.