ऑस्ट्रेलियातील स्वानंद कुलकर्णी यांनी गडचिरोलीतील शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

202

– अन्न प्रक्रिया उद्योंगातील संधींचा लाभ घेण्याचे केला आवाहान
The गडविश्व
गडचिरोली, १४ डिसेंबर : नवउद्योजकांनी ऑस्ट्रेलियातील अन्न प्रक्रिया उद्योगातील संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन ऑस्ट्रेलियातील अन्न सुरक्षा लेखापाल, ब्रिसबेन, स्वानंद कुलकर्णी यांनी केले. ते गडचिरोली येथे जिल्हा कृषि महोत्सव-२०२२ चे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना आभासी पध्दतीने मार्गदर्शन करतांना बोलत होते.
त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये व्यवसाय चालु करणे, ऑस्ट्रेलियातील शेती व भारतातील शेतीमधील फरक व ऑस्ट्रेलियातील शेतीमध्ये मोठ्याप्रमाणात स्वयंचलनाचा वापर, संरंक्षित शेती याविषयी माहिती दिली. डॉ. पोटदुखे, सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र तज्ञ, डॉ.पं.दे.कृ.वि. नागपुर
यांनी अ‍ॅझोला तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करुन नत्रखतांचा वापर कमी करता येऊ शकते याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.भालचंद्र ठाकुर, संचालक, रुची ग्रुप ऑफ कंपनी यांनी ड्रॅगन फ्रुट या नाविण्यपुर्ण फळ पिक लागवडी विषयी माहिती दिली. गडचिरोली जिल्ह्यातील जमिन व हवामान ड्रॅगन फ्रुट लागवडीस पोषक असुन सुरुवातीला कमी क्षेत्रावार प्रायोगिक तत्वावर लागवड करुन नंतरच मोठ्याप्रमाणात लागवड करावी असे सांगितले. तसेच ड्रॅगन फ्रुट फळपिकाचे रोपे फक्त शासनमान्य रोपवाटींकांमधुन घेण्याचे आव्हान केले.
डॉ.यशवंत उमरदंड, पशुधन विकास अधिकारी यांनी आधुनिक पध्दतीने शेळीपालन विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेळीपालनकरीता स्थानीक जातीवंत शेळ्यांचा उपयोग करावा, शेळी / बोकडांची निवड, आहार, रोग, लसीकरण वेळापत्रक, दैनंदीन घ्यावयाची काळजी इ. विषयी माहिती दिली. डॉ. संदिप कांबळी,
तेलबियाणे शास्त्रज्ञ, डॉ.पं.दे.कृ.वि. नागपुर यांनी मोहरी, जवस या तेलबियाणे पिकाच्या लागवडी विषयी, माहिती दिली. मंगळवार १३ डिसेंबर रोजी जिल्हा कृषि महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्यासंख्येने शेतकरी बंधु व भगिनींनी प्रदर्शनीला भेट देऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला. तसेच कृषि प्रदर्शनामध्ये उपस्थित आत्मा, माविम व उमेद यांच्या गटांकडुन मोठ्याप्रमाणात मुल्यवर्धीत पदार्थ व शेतमाल यांची विक्री झाली.
तरी भरपुर संख्येने शेतकरी बांधवांनी व गडचिरोलीतील नागरीकांनी कृषि प्रदर्शनीला भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष, जिल्हा कृषि महोत्सव समिती, गडचिरोली यांनी केले.

(The Gadvishva ) (Swanand Kulkarni from Australia guided the farmers of Gadchiroli) (Gadchiroli News Updates) (France vs Morocco) (Vijay Sethupathi) (Meteor shower) (Arsenal vs Milan)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here