– पहिल्याच दिवशी जनतेचा उत्तम प्रतिसाद
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १८ जून : आम आदमी पार्टी तालुका कुरखेडा च्या वतीने चीचटोला येथून स्वराज्य संवाद यात्रेला सुरवात करण्यात आली.
तालुका अध्यक्ष ईश्वर ठाकुर यांच्या नेतृत्वात आणि रामसाय मडावी, अतुल शींद्राम यांच्या आयोजनानुसार गावातील बहुसंख्य उपस्थित जनतेने संवाद साधत दिल्ली आणि पंजाब मध्ये होत असलेल्या कामाची स्तुति करत महाराष्ट्रात सुद्धा आम्हाला आप चे सरकार हवे आहे असे मत व्यक्त केले. दरम्यान पहिल्याच दिवशी स्वराज्य संवाद यात्रेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद पहावयाला मिळाला.
या स्वराज्य संवाद यात्रेत तालुक्याचे आप चे वरिष्ठ नेते नासिर हाशमी, तालुका उपाध्यक्ष चेतन गहाने, तालुका संघटन मंत्री रामसाय मडावी, तालुका व्यापारी अध्यक्ष दीपक धारगाये, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अयाज भाई, मीडिया प्रमुख साहिल सहारे, हीरा भाऊ चौधरी, तालुका सचिव ताहिर शेख, शहजाद हाशमी, तसेच चीचटोला येथील बहुसंखेने गावकारी उपस्थित होते.