– नायब तहसीलदार एच.एन. दोनाडकर यांचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : आरमोरी शहरासह ग्रामीण भागातील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यासोबतच विविध उपक्रम राबवून शासकीय कार्यालय तसेच शाळा, महाविद्यालये तंबाखूमुक्त करा, अशा सूचना नायब तहसीलदार एच.एन. दोनाडकर यांनी दिल्या.
आरमोरी येथील तहसील कार्यालयात दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत मुक्तिपथ तालुका समितीची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून नायब तहसीलदार एच.एन. दोनाडकर बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार डी. एम. वाकुडकर, सहायक संवर्ग विकास अधिकारी अशोक कुर्रझेकर, पोलिस निरीक्षक कैलास गवते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप वासनिक, नप कार्यालय अधीक्षक प्रितेश काटेखाये, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी पी.एस.चौधरी, मुक्तिपथ तालुका संघटक विनोद कोहपरे, सौ. किरण दहिकर समुपदेशक राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग डॉ. गजेंद्र कडव, केंद्र प्रमुख रघुनाथ बुल्ले, सुनीता तागवान, प्रा. दौलत धोटे, प्रा . सुनंदा कुमरे, शहर संघटन सदस्य चंदा राऊत, तुळशीदास मैंद, मुक्तिपथच्या मनीषा प्रधान, स्वीटी आकरे आदी उपस्थित होते.
बैठकीत आरमोरी तालुक्यातील एकूण २२ गावात अवैध दारूविक्री सुरु आहे. पोलिस विभागाद्वारे दारूविक्रेत्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. शाळा दारू व तंबाखूमुक्त करावी. मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती सक्रिय करण्यासाठी पाठपुरावा करावा. रुग्णांना तालुका क्लिनिकला पाठवावे. आरमोरी शहरात व ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती सर्व विभागणी मिळून करावी. व्यसन उपचार शिबीर प्रत्येक गावात दर महिन्याला लावून दारू व तंबाखूच्य्या व्यसनी रुग्णांना समुपदेशन करावे. ३ वर्षांपासून अवैध दारु व तंबाखूविक्री बंद असलेल्या गावात विजयस्तंभ उभारणी फ़ंड ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातून देण्यात यावे. शाळास्तरावर तंबाखुमुक्त शाळा समिती तयार करून शिक्षण विभागाने पाठपुरावा करावा. दारूविक्रेता दिव्यांग असेल तर त्याला पर्यायी व्यवस्था रोजगार, मार्गदर्शन मुक्तिपथ अभियानामार्फत जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधून स्किल बेस प्रशिक्षण देण्यात यावा. एनसीडी विभागाने सुगंधित तंबाखू विकणाऱ्या किराणा व पानठेले धारकांना नोटीस द्यावे व तसे संबंधित बोर्ड लावण्यास सांगणे न लावल्यास संयुक्त सर्व विभाग मिळून कार्यवाही करावी. नगरपरिषद मार्फत आरमोरी शहरातील सर्व वार्डात कोटपा कायद्याअंतर्गत तंबाखू व दारूवर कार्यवाही करण्यात यावी. सर्व आस्थापना विभाग दारू व तंबाखूमुक्त करण्यात यावे. आदी मुद्द्यांवर चर्चा करून सर्वानुमते ठराव घेण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )