The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, (चेतन गहाने) दि. १३ : केंद्र शासनाने हस्त कारागीराना प्रोत्साहन देण्याकरीता प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही महत्वकांक्षी योजणा सूरू केली आहे. जिल्हा व तालुक्यातील पारंपरिक पध्दतीने आपला व्यवसाय करीत असलेल्या पात्र लाभार्थानी योजनेचा लाभ घेत पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड द्यावी असे आवाहन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे आरमोरी विधानसभा सहसमन्वयक तथा भाजपा ओबीसी आघाड़ीचे जिल्हा महामंत्री रविन्द्र गोटेफोडे यानी केले.
सदर योजने अंतर्गत असंगठित क्षेत्रात स्वंयरोजगार तत्वावर हात अवजाराने काम करणारे १८ कुटुंब आधारित पारंपरिक व्यवसायापैकी एका व्यवसायात गूंतलेले सूतार, लोहार,भांडी मूर्ती कारागीर, कुंभार, मूर्तिकार, सोनार, पादत्राणे कारागीर, गवंडी, न्हावी, माळी, परिट, शिंपी, मासेमारी जाळी बनविणारे आदि योजनेत पात्र आहेत. या कारागीराना तज्ञ प्रशिक्षकाकडून कौशल्य विकास प्रशिक्षण, मूलभूत प्रशिक्षण, प्रगत प्रशिक्षण तसेच प्रशिक्षण कालावधीत पाचशे रूप ये प्रतिदिवस विद्यावेतन व टूलकीट प्रोत्साहन म्हणून १५ हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर व्यवसायाकरीता आवश्यक चांगल्या व आधुनिक संसाधनाकरीता विनातारण व सवलतीचा व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध करून देण्यात मदत करण्यात येणार आहे. तसेच उत्पादित मालाला ब्रांड प्रमोशन तसेच मार्केट लिंकेजकरीता व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून व्यवसाय वृध्दि करीता नविन संधी उपलब्ध होईल हा योजनेमागील उद्दिष्ट आहे.
योजनेचा लाभाकरीता लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असुन ग्रामपंचायतच्या सिएससी केंन्द्रातून अर्ज करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समीतीने अर्जाला मान्यता दिल्यावर पात्र लाभार्थाना योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्रतेचा निकष पूर्ण करणाऱ्या इच्छूकानी तातडीने अर्ज करावा असे आवाहन रविन्द्र गोटेफोडे यानी केले आहे.