– भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २५ : शहरातून होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या धुळीचे निराकरण करण्याची मागणी धानोरा तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत धानोरा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धानोरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागतो आहे. नगरातून होत असलेल्या कामावरील काम करीत असलेले कंपनीची माणसे आणि इंजिनियर गावातील प्रतिष्ठीत लोकांना विश्वासात न घेता काम करतात. योग्य प्रमाणात आजुबाजुला माती भरत जात नाही. उद्धट उत्तरे देतात तरी सर्व समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी
सारंग साईनाथ साळवे, साजन गुंडावार,संजय कुंडो, सुभाष धाईत, सुभाष खोब्ररे, बाळू उंदिरवाडे, राकेश दास, पराग देशपांडे, भक्त दास गडपायले, देविदास मोहुर्ले, सौरव सहारे यांनी केली आहे.
