– आमदार रामदास मसराम सह काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचीही उपस्थिती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : जिल्ह्यातील वनविभागाशी संबंधित विविध समस्यांना घेऊन गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा केली यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार, गडचिरोली जिल्ह्यातील वनविभागाचे सर्व उपवनसंरक्षक, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, जावेद शेख, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलट्टीवार सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वन्यप्राण्याच्या हल्यावर प्रभावी उपययोजना करणे, वन्यप्रान्याच्या हल्यातील मृत, जखमी किंवा नुकसान ग्रस्ताना तातडीने आर्थिक सहाय्यक देने, वनविभागाच्या परवानगी करीता प्रलंबित असलेली विकास कामे, रस्ते यांना परवानगी देणे, आवश्यक त्या ठिकाणी बिट, बांबू उपलब्ध करून देने या सारख्या विविध विषयावर चर्चा सविस्तर चर्चा या बैठकित करण्यात आली.