पिसेवडधा – सुरसुंडी मार्गाचे डांबरीकरण करा
– गावकऱ्यांची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १४ : आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा ते धानोरा तालुक्यातील सुरसुंडी या मार्गाचे खडीकरण होवून त्यावर चुरी टाकल्यामुळे दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच्या कच्ची चूरी दुचाकी व चारचाकी वाहनाना धोकादायक असल्याने या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारक व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
आरमोरी आणि धानोरा तालुक्याला जोडणारा हा मार्ग असुन पिसेवडधा ते सुरसुंडी या गावातील अंतर २३ किलो मिटर आहे. या मार्गावर अनेक गावे आहेत. नेहमी रहदारीचा मार्ग असलेल्या या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असते मात्र याचा त्रास सर्व नागरिकांना होत आहे. संबंधित विभागाने वेळीच खबरदारी घेऊन डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora #gadchirolilocalnews )