– आजारी असलेल्या बालकास केली आर्थिक मदत
The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी ( प्रवीण जोशी), २३ फेब्रुवारी : येथून जवळच असलेल्या गांजेगाव येथील कॅन्सर पीडित बालकाला मदतीसाठी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस सरसावले व त्यांनी चिमुकल्याच्या पुढील उपचारासाठी पाच हजार रुपये मदत देऊन आपला मोलाचा वाटा उचलला व त्यांच्यातला एक जागरूक पालक संवेदनशील पोलीस अधिकारी असल्याचे यावेळी आढळून आले.
गांजेगाव स्थित विहर्ष नामक बालक दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे कळले त्या क्षणी तरुणांनी शिवजयंती गाजावाजा न करता गावातील दुर्धर आजाराची झुंज देत असलेल्या बालकाला आर्थिक मदत करण्याचे ठरवले व ती संकल्पना सत्यात आणून माणुसकीचे उत्तम दर्शन घडविले खरे व ही बाब बीटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रताप भोस यांना कळले असता त्यांनी सुद्धा या कामासाठी खारीचा वाटा उचलला व पाच हजार रुपये मदत केली. यातून पोलिसातील खाकी वर्दीच्या पाठीमागे सुद्धा एक माणूस दडलेला असून पोलीस सुद्धा आपल्यासारख्याच मध्यमवर्गीय कुटुंबातून त्यांची जडणघडण होते त्यामुळे ते सुद्धा हळव्या मनाचे असतात त्यांना पण संवेदना, भावना नातेसंबंध व मुख्य म्हणजे माणुसकी या सर्व बाबींची जाण असते हे त्यांच्या कृतीतून दिसते व येणाऱ्या भविष्यकाळातील अनेक अधिकाऱ्याने पुढे सुद्धा याची आठवण राहून ते अधिकारी सुद्धा अशा मदतीच्या स्वरूपात आपले कर्म करतील. तसेच सदर उपचार करतेवेळी गरज भासल्यास आणखी सुद्धा इतरांना मदतीचे आव्हान करून जास्तीत जास्त मदत बालकाला मिळवून देण्याचा प्रयत्न करून बालकाच्या उपचारार्थ निधी उपलब्ध करून देऊ असे यावेळी ठाणेदार म्हणाले.
पोलीस म्हणल्यानंतर त्यांच्याकडील काठींच्या व बाजीरावांच्या महाप्रसादाची चर्चा व आठवण दीर्घकाळ चालते व अनेकांची भंभेरी उडते पण त्यांच्या या कृतीमुळे मात्र ते सुद्धा आपल्या सारखेच भावना प्रधान आहेत याची जाण होते म्हणूनच की काय एका सुभाषितकाराने म्हणल्याप्रमाणे एका बाबीची जाण होते “पोलिसाच्या आतही असतो माणुसकीचा झरा पोलिसातील माणूस आपण जाणून घेऊ जरा”
(The Gadvishva) (The Gdv) (Dhanki)