The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २९ : स्वर्गीय विक्रांत वारजूरकर व स्वर्गीय जिग्नेश धंधूकीया यांचा स्मृती निमित्त मागील १५ वर्षापासून येथील यूवक मंडळी पुढाकार घेत नविन वर्षाचे स्वागत सत्कार्याने व्हावे व नव्याने रूजू झालेली हूळदंगी परंपरेला आळा बसावा या उद्देशाने ३१ डिसेंबर रोजी मावळत्या वर्षाला रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमा द्वारे स्वागत करतात ही परंपरा यावर्षी सूद्धा कायम राहणार आहे. युवकांनी या सत्कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेवक सागर निरंकारी यांनी केले आहे.
अलीकडे मावळत्या वर्षाला निरोप देताना व नविन वर्षाचे स्वागत करताना नविन युवकांची पीढी बेभान होत व्यसनाधिनतेचा कळस गाठत आहे. नव्या पीढीत नको त्या व्यसनाचा शिरकाव थर्टी फर्स्ट निमित्त आयोजित होणाऱ्या पार्टी मधुनच होतो, या रूजू झालेल्या वाईट परंपरेला फाटा देण्याकरीता मागील १५ वर्षापासून येथील काही सामाजिक कार्यकर्ते पूढाकार घेत यूवकाना वर्षाचा निरोप व नविन वर्षाचे स्वागत थर्टी फर्स्ट चा हूळदंग पणाने न करता रक्तदान करीत आपली सामाजिक जाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. या उपक्रमाला मागील १५ वर्षापासून बऱ्यापैकी प्रतिसाद सूद्धा मिळत आहे, यावर्षी सूद्धा मंगळवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजता दरम्यान सिंधी भवन कुरखेडा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात मोठ्या संख्येत युवकांनी सहभागी होत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे आवाहन नगरसेवक सागर निरंकारी, मधूकर वारजूरकर, यशपाल सहारे, सोनू रहांगडाले, विवेक निरंकारी, प्रवेश सहारे,मयूर सहारे,आशू बागडे, गोलू वैद्य, नौशाद सय्यद,पंकज टेंभूर्णे यांनी केली आहे.