अवैध दारू हद्दपार करण्यासाठी शहर संघटना करणार प्रयत्न

189

– कोरची संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
The गडविश्व
गडचिरोली, २७ डिसेंबर : कोरची शहरातील हनुमान मंदिराच्या सभागृहात शहर संघटनेच्या बैठकीचे आयोजन नीराताई बघवा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी अवैध दारू विक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व अवैध दारू शहरातून हद्दपार करण्यासाठी शहर संघटनेच्या सदस्यांनी यावेळी ठराव घेतला.
नगरपंचायतीचे बाबासो हाक्के यांच्या सहकार्याने बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक मेघश्याम जमकातन यांनी शहरातील अवैध दारुविक्री बंद झालीच पाहीजे. विक्रीबंदी झालीतर शहरातील युवकांचे पिण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल असे मत व्यक्त केले. वार्डातील समीत्या सक्षम व बळकट करण्याचे मत मनोज अग्रवाल यांनी मांडले. कोरचीचे पोलिस निरीक्षक अमोल फरतरे हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते, संपुर्ण वार्डात समीत्या असणे गरजेचे आहे. शहर संघटणेमुळे अवैध दारुविक्री बंदी करणे सोपं होईल. प्रत्येक वार्डातील नागरिकांना दारु बंद करण्याचा अधिकार आहे. समाजाने ठरवल तर शहरातील दारु विक्री बंद होणारच असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शहरातील वार्ड नं ७, ८, ९, १४ या वार्डात विक्रीचे प्रमाण जास्त आहे. येथे समीत्या तयार करण्यासाठी नगरसेवकांनी जबाबदारी घ्यावी. पोलीस विभागाची मदत आणी मुक्तीपथच्या सहकार्याचे समीती तयार करणे, शहरातील देशी-विदेशी दारू विक्रेत्यांवर कारवाई करणे यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान शहर संघटन गठीत करण्यात आले व दर दोन महिन्यातून एकदा या संघटनेची बैठक होऊन या बैठकीचे मिनिट्स एसडीपीओ व पोलीस अधीक्षक साहेबांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्षा हर्षलता भैसारे, उपाध्यक्षपदी माजी सैनिक चतुर सिंद्राम यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी मनोज अग्रवाल, पोलीस उपनिरिक्षक आशावरी शेडगे, पोलिस पाटील लालाजी तोफा, जिप केंद्र शाळेचे शिक्षक मारोती अंबादे, वनश्री कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. चहारे, प्राचार्य देवराव गजभिये, मुख्याध्यापक शालीकराव कराडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष धुवरीया, आशीष अग्रवाल, नितीन रहेजा, राहुल अंबादे, कोमल अंबादे, रामनाथ कोरचा, ज्योतीताई भैसारे, कुमारी फुलकवर, बंसती नैताम, दिलीप मडावी, विठ्ठल गुनुले, मालता हिडामी, प्रतीभा मडावी, संतोष मोहुर्ले, श्रीहरी मोहुर्ले, दृवराज कुमरे, सिताबाई अडभैया, गयाबाई बागडे, दिगांबर पडोटी, रजोला सोनार, प्रमिला गंधेल, ईंदलसाय बिच्छी, जगन जमकातन, बळीराम श्रीरामे, दामोधर कुंभारे, अंगणवाडी सेविका समुन मडावी, लता मडावी, मोहुर्ले, अंबादे,आशा वर्कर कांता मोहुर्ले, शालु शेंडे, जयश्री मोहुर्ले, कल्पना कराडे, कमलेश भानारकर आदींची निवड करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी दारु व तंबाखु बंदीचे कायदे सांगत मार्गदर्शन केले.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Salman Khan) (David Warner) (Steve Smith) (Sandeep Sharma) ( Chelsea vs Bournemouth ) (Road Accident) (DHanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here