The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : गडचिरोली-चिमूर लोकसभेच्या उमेदवारीचा अखेर तिढा सुटला असून या क्षेत्राकरिता अखेर विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
भाजपच्या वतीने आज २४ मार्च रोजी १११ जणांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली त्यात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राकरिता महायुतीकडून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) विद्यमान मंत्री धर्मरावबाब आत्राम उत्सुक होते तसेच नवा चेहऱ्याला संधी मिळणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. एकंदरीत या क्षेत्राचा उमेदवारी करिता अशोक नेते यांच्यासह धर्मरावबाब आत्राम, डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता या क्षेत्राच्या उमेदवारीचा तिढा सुटला असून विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर काँग्रेसकडून डॉ.किरसान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. #thegadvishva #thegdv #gadchirolinews #loksabha_election2024 #loksabhaelection2024 #gadchirolichimur #ashoknete #namdeokirsan