– वनविभागात खळबळ, घातपात की काय ?
The गडविश्व
मूल, १२ सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे मृत्यूसत्र सुरूच असून आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील शेतशिवारात वाघ मृतावस्थेत आढळल्याची घटना मंगळावर १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
मूल तालुक्यांतील फिस्कुटी येथील एका शेतशिवारात आज सकाळच्या सुमारास काही महिला धान शेतीत निंदन करण्यासाठी गेले असता वाघ मृतावस्थेत आढळून आला. लागलीच माहिती सारपंचा मार्फत वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनकर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल हिट पाहणी केली. सदर मृतक वाघ हे मादी असून दोन ते अडीच वर्षीची असावी असा अंदाज बांधण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मूल सिंदेवाही मार्गावर वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. आणी आता पुन्हा सदर घटना उघडकीस आल्याने मात्र वनविभागात खळबळ उडाली असून जिल्ह्यातील वाघांचे मृत्यूसत्र या ना त्या कारणाने सुरू आहेत. कधी शिकार, कधी अपघात तर कधी दोघांची झुंज यामुळे देखील वाघांचे मृत्यू झाल्याच्या घटना पूढे आल्या आहेत.
(the gdv, the gadvishva, chandrpur tiger, mul, fiskuti, )