धोंडणे दांपत्याकडून वाचनालयाला ४० स्पर्धा पुस्तकांचा अनमोल संच भेट

201

– मुलीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १४ : सामाजिक बांधिलकी जपत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधत, कुरखेडा येथील कैलाश व प्राची धोंडणे या दांपत्याने आपल्या मुलगी तनिष्क हिच्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत एक समाजप्रेरक पाऊल उचलले आहे. त्यांनी नगरपंचायतच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयासाठी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा ४० पुस्तकांचा संच स्वतःच्या खर्चाने उपलब्ध करून दिला.
विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याची कमतरता लक्षात घेत धोंडणे दांपत्याने हे प्रेरणादायी पाऊल उचलले. आज पुस्तकांचा संच वाचनालय व्यवस्थापनाला औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अनीता बोरकर, महिला व बालकल्याण सभापती प्राची धोंडणे, पाणीपुरवठा सभापती आशिष काळे, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, नगरसेवक जयेन्द्रसिंह चंदेल, रामभाऊ वैद्य, नगरसेविका हेमलता नंदेश्वर, कांताबाई मठ्ठे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश धोंडणे आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धोंडणे कुटुंबाचा हा उपक्रम समाजातील इतर नागरिकांनाही प्रेरणा देणारा असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक मौल्यवान देणगी ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here