– अपघाताच्या प्रमाणात वाढ
The गडविश्व
ता.प्र /धानोरा, २३ फेब्रुवारी : तालुक्यातील रांगी आणि आरमोरी तालुक्यातील विहिरगाव ते कोरेगाव या गावांमधून जाणारा रस्ता धानोरा येथे गेलेला आहे. या मार्गांचे काम बरेच दिवसा पासून रेंगाळले होते. अखेर या मार्गाचे काम कंत्राटदाराने हाती घेऊन नूतनीकरण करण्यात आले. मात्र या मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या कडा मुरमाने भरलेल्या नसल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.
मार्गाच्या कडा काही गावापर्यंतच भरलेले आहेत मात्र विहीरगाव ते कोरेगाव पर्यंत दोन्ही बाजू तसेच खोलगट आहेत या कडा न भरल्याने दुचाकीने जाणाऱ्या वाहनाला समोरून किंवा मागच्या बाजूने एखादे मोठे वाहन आले तर साईड देताना तारेची कसरत करावी लागते. त्याचप्रमाणे त्या मार्गावर रस्त्याच्या कडेला मोठमोठे झाडे असून रांगी ते विहिरगाव मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण झाले नसल्याने वाहतुकीस अडचण होत आहे. दररोज होणारे अपघात रोखण्यासाठी रांगी ते वैरागड मार्गावरील झाडे वाहतुकीस अडसर ठरत असल्याने झाडे तोडून रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रांगी ते आरमोरी मार्गावर वाहनाची मोठी वर्दळ असते दोन चाकी, चार चाकी, महामंडळाची बस, अवजड वाहने चालतात. रस्त्यावर वाहनाची वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांची कटाई करणे गरजेचे आहे. नव्याने रस्ता करताना कंत्राटदारांनी रुंदीकरण केले नाही. तसेच डांबरीकरण करताना रांगी गावातून खोदकाम केले नाही. जुन्याच रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे डांबरीकरण टिकणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. रस्त्यावर मोरी बांधकाम ( छोटे पुल) करण्यासाठी आणलेले सिमेंटचे पाईप तिथेच पडून आहेत. याकडे मात्र संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
आरमोरी तालुक्यातील वैरागड आणि धानोरा तालुक्यातील रांगी यातील अंतर २० किमी असून त्यापैकी रांगी ते विहीर गाव मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले नाही. रांगी ते विहिरगाव पर्यंत रस्ता अरुंद असून रस्त्याला लागूनच मोठ्या प्रमाणात झाडे असून ही झाडे वाहनांना धोकादायक त्याचप्रमाणे दोन्ही बाजूच्या कडा न भरल्याने धोकादायक असल्याने ते एक प्रकारे अपघाताला आमंत्रण देतात परिणामी वाहनधारकांना कमालचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज येणारे विद्यार्थी व कर्मचारी यांच्यासाठी ही झाडे व दोन्ही बाजूच्या कडा एक प्रकारे डोकेदुखी ठरत असल्याने झाडांच्या फांद्या तोडून व रस्त्याच्या दोन्ही कडा भरून दुरुस्ती करण्या यावी अशी मागणी होत आहे.
(The Gadvishva) (Chandrpur News Updates)
(Chandrapur Collector) (Vinay Gowda) (National Commission for Scheduled Tribes) (Maharashtra DGP Rajnish Seth)
(Jiwati Taluka) (Kusumbi)