– महिला पदाधिकाऱ्यांनीही केले नृत्य
The गडविश्व
गडचिराेली, ३ ऑगस्ट : काॅंग्रेसचे ज्येष्ठ व वजनदार नेते, ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची काॅग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभेतील विराेधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान जिल्हा काॅग्रेस, युवक काॅग्रेस, महिला काॅग्रेस व सर्व सेलच्या वतीने बुधवार २ ऑगष्ट राेजी गडचिराेली येथील इंदिरा गांधी चाैकात फटाके फोडून आनंद व जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी विजय भाऊ आगे बढाे, हम तुम्हारे साथ है, अशी नारेबाजी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केली. विशेष म्हणजे याप्रसंगी महिला पदाधिकाऱ्यांनी ढाेल व संदलच्या तालात नृत्याचा ठेका धरला.
यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डाॅ. नामदेव किरसान, जि. प. चे माजी सदस्य ॲड. रामभाऊ मेश्राम, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काॅग्रेसचे माजी प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, युकाॅचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, प्रदेश सहसचिव कुणाल पेंदोरकर, जिल्हा महिला काॅग्रेसच्या अध्यक्ष ॲड. कविता मोहरकर, प्रदेश महिला चिटणीस डाॅ. चंदा कोडवते, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रभाकर वासेकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. हेमंत अप्पलवार,अनिल कोठारे, माजी नगरसेवक रमेश चाैधरी, नंदू कायरकर, रजनीकांत माेटघरे, प्रतीक बारसिंगे, राकेश रत्नावार, वसंत राऊत, बाशीद शेख, आरिफ कनोजे, प्रफुल आंबोरकर, सर्वेश पोपट, सुरेश भांडेकर, राजाराम ठाकरे, देवेंद्र ब्राम्हणवाडे ,कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे, वैशाली ताटपल्लीवार, अर्पणा खेवले, पौर्णिमा भडके, कल्पना नंदेश्वर, प्रेम जिल्हेवार, आशा मेश्राम,संजय चन्ने, लालाजी सातपुते आदीसह पादाधिकारी व कार्यकर्ते माेठया संख्येने उपस्थित हाेते.