जूनी पेंशन सह अन्य समस्या करीता लढा सूरू राहील : आ.सुधाकर अडबाले

150

– गोठणगांव येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) दि. ०८ : संघटनेच्या माध्यमानेच विधान परिषदेत संधी मिळाली, या अल्पकालावधीत शिक्षकांच्या अनेक समस्या मार्गी लावण्यात यश जरी आले असले तरी जूनी पेंशन लागू करने या प्रमूख मागणी सह शिक्षक वर्गाचा अनेक समस्या शासनस्तरावर प्रलंबीत आहेत. या समस्या मार्गी लावण्याकरीता संघटनेच्या माध्यमाने अविरत लढा सूरूच राहील, शिक्षकाने भक्कमपणे संघटनेच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य सरकार्यवाह तथा विधान परिषद सदस्य आ. सुधाकर अडबाले यानी केले.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे गडचिरोली जिल्हा अधिवेशन रविवार ०७ जानेवारी रोजी कुथे पाटील विद्यालय गोठणगांव येथील पटागंणात आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन आ.सुधाकर अडबाले यांचा हस्ते करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष माजी आ.व्ही यू डायगव्हाणे होते यावेळी प्रमूख अतिथी म्हणून सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक योगराज कुथे, जिल्हा संस्थाचालक संघाचे सचिव जयंत येलमूले, विदर्भ ज्यूनिअर कालेज टिचर्स एसोसिएशन चे डॉ. अशोक गव्हाणकर, शेमदेव चाफले, तूकाराम शिक्षण संस्थेचे सचिव पि आर आकरे, हिरामन पांडव शिक्षण संस्थेचे सचिव अॅड अजय पांडव, बहुजन हिताय शिक्षण संस्थेचे सचिव कृपाल मेश्राम, जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष गूरूदेव नवघडे, प्रा विजय कूत्तरमारे, काशीनाथ कूंडगीर, सेवानिवृत्त मूख्याध्यापक विनायक मेश्राम, प्रा. फूंडे आदि उपस्थित होते. अधिवेशनात स्वागताअध्यक्ष म्हणून जबाबदारी मूख्याध्यापक कूंडलीक बगमारे यानी पार पाडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना मार्गदर्शन करताना डायगव्हाणे यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबीत समस्यांचा आढावा घेत संघटणा त्या मार्गी लावण्याकरीता सर्वोतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. अधिवेशनात जूनी पेंशन योजना, आश्वासित प्रगती योजणा, पात्र शिक्षकाना सरसकट निवड श्रेणी लागू करने, शिक्षकांचे अशिक्षित कामे बंद करने, थकीत वेतन, भत्ते, एकस्तर वेतनश्रेणी या विविध विषयावर चर्चा व मंथन करीत या समस्या मार्गी लावण्याकरीता संघटनेचा माध्यमाने लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच अधिवेशनात शिक्षक संघाचा कॅलेडंरचे प्रकाशन तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा जिल्हा कार्यकारीणीची नव्याने निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व अहवाल वाचन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव अजय लोंढे, संचालन सूत्रसंचालन योगानंद फरांडे तर आभार शिक्षीका राजश्री कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे तालूका अध्यक्ष लिकेश कोडापे, कार्याध्यक्ष चंन्द्रकांत नरूले,, कार्यवाह रेमाजी बावणे, कोषाध्यक्ष सूधाकर उईके, यांचासह सर्व कार्यकारिणी व सदस्यानी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here