– सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, १९ जुलै : गडचिरोली जिल्हाभरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अतिवृष्टीने अनेक ठिकाणी पाणीही साचले आहे. अशातच कुरखेडा तालुका मुख्यालयातील राणाप्रताप वार्डातील एका घराचे समोरचे छत रात्रो सुमारे दोन वाजताच्या सुमारास कोसळून राहत्या घराची पडझड झाली आहे.
कुरखेडा शहरात शनिवार पासून मुसळधार आहे. पावसामूळे येथील अनेक कच्चा विटा मातीचा घराना तळे गेले आहे. दरम्यान सोमवारला रात्रो दोन वाजताच्या सुमरास येथील राणाप्रताप वार्डातील विमल खडसे यांचे राहत्या घराच्या समोरील स्लॅबचे छत संतधार पावसाने कोसळले आहे. प्रशासनाकडून त्यांना नूकसान भरपाई देण्यात यावी म्हणून प्रशासनातर्फे पंचनामा करण्याकरीता महसुल विभागाचे तलाठी ठाकरे व त्यांचे सहकारी दाखल झाले होते . यावेळी वार्डातील नगरसेविका कांता मठ्ठे, रमेश खडसे व घराजवळील नागरिक उपस्थित होते.