गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेने चारचाकी वाहनासह मुद्देमाल केला जप्त

111

– चारचाकी वाहन व दारू साठा जप्त
The गडविश्व
गडचिरोली, ११ सप्टेंबर : सावली तालुक्यातील व्याहाड येथील राज बार मधून दारू गडचिरोली येथे दारू सुमो ने वाहतूक होणार असल्याच्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित वाहनाचा पाठलाग केला असता ०२ अज्ञात इसम बोदली गावाच्या जवळ वाहन थांबवून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. वाहनाची झडती घेतली असता वाहनात विदेशी दारू व बियर असा ३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल व सदर वाहन अंदाजे किंमत ५ लाख असा एकूण ८ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई ६ सप्टेंबर ला करण्यात आली.
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधिक्षक निलोत्पल सा. यांनी अवैध दारु विक्री करणा­ऱ्यांवर कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.
६ सप्टेंबर रोजी पहाटे गडचिरोली शहरातील अवैध दारु वाहतूक संदर्भात कारवाई करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड व प्रशांत गरफडे, श्रिकृष्ण परचाके, श्रीकांत बोईना, चापोहवा मनोहर तोगरवार यांचे सह शासकिय वाहनाने रवाना झाले असता आकाश भरडकर हा दामदेव मंडलवार आणि त्यांचे २ मुले चालवीत असलेल्या राज बार येथून दारुचा मुद्देमाल घेऊन चारचाकी सुमो वाहनाने गडचिरोली शहरात आणणार आहे. अश्या गोपणीय माहितीच्या आधारे आधारे मुल रोडवर शोध घेत असतांना सदर संशयित वाहन सेमाना बायपास मार्गे पोटेगाव रोड व तिथुन चातगावकडे पळून जात असताना त्यांचा पाठलाग केला असता वाहनात असलेले ०२ अज्ञात इसम बोदली गावाच्या जवळ वाहन थांबवून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. सदर वाहनाची पाहणी केली असता त्यात विदेशी दारु व बियर ३ लाख २४ हजार व वाहन किंमत अंदाजे ५ लाख रुपये असा एकुण ८ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे आकाश भरडकर, निखील व नीरज मंडलवार तसेच दोन अनोळखी इसमांविरुद्ध कलम 65 (अ), 83, 98 (2) महा. दा. का. सह कलम 353, 332 भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्रातील पुढील तपास सपोनि. आव्हाड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here