‘The गडविश्व’ च्या वृत्ताची दखल : दिशाभूल करणाऱ्या ‘त्या’ फलकाची दुरुस्ती

928

– नवख्या प्रवाशांचा संभ्रम होणार दूर
The गडविश्व
गडचिरोली, १४ डिसेंबर : गडचिरोली येथील कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा न्यायालयानजीकच्या गडचिरोली- मूल मार्गावर असेलल्या कोटगल फाट्यावर लावण्यात आलेल्या फलकावर आरमोरीकडे जाणारी दिशा चुकीची दर्शविल्याने चंद्रपूर- मूल मार्गे येणारे नवखे प्रवासी बुचकळ्यात पडत होते. यासंदर्भात ‘The गडविश्व’ ने वृत्त प्रकाशित करून संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत नवख्या प्रवाशांची दिशाभूल करणाऱ्या फलकामध्ये दुरुस्ती करण्यात आली. आता प्रवाशांचा संभ्रम दूर झाला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गडचिरोली येथील कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा न्यायालय-सेमाना बायपास या चौरस्त्याच्या कडेला दिशादर्शक व पुढील गावाची वाट दाखवणारा भला मोठा फलक लावण्यात आला आहे. या फलकावर आरमोरी तसेच धानोरा या तालुका मुख्यालयाचे दिशा व अंतर दर्शविले आहे. त्यानुसार आरमोरी जाण्याकरिता डाव्या बाजूला दिशा निर्देश दिले असल्याने चंद्रपूर- मूल मार्गे येणारे अनेक नवखे प्रवासी कोटगल पर्यंत जाऊन परत येत होते. कॉम्प्लेक्स पासून जवळपास ३ ते ४ किमी अंतरावरून शहरातील इंदिरा गांधी चौक येथून डाव्या बाजूस वळल्यास आरमोरीला जाता येतो. मात्र येथे कॉम्प्लेक्स परिसरात न्यायालयानजीक कोटगल कडे जाणाऱ्या मार्गावर फलक लावल्याने अनेकदा नवखे प्रवासी फलक वाचून इथूनच डाव्या बाजूला आरमोरी जाण्यास मार्ग आहे असे समजून कोटगल पर्यंत जहायचे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात ‘The गडविश्व’ ने वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभागाने सदर फलकात दुरूस्ती केली आहे. आता आरमोरीकडे प्रवास करणाऱ्या नवख्या प्रवाशांचा संभ्रम दूर होणार आहे.©©

या वृत्ताची दखल : गडचिरोली : हाच का तो आरमोरी मार्ग ? राष्ट्रीय महामार्गावरील फलकामुळे प्रवासी बुचकळ्यात

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Kotgal) (Zika Virus) (France vs Morocco) (Vijay Sethupathi) (Meteor shower) (Arsenal vs Milan) (Chandrapur) (Mul) (The Gadvishwa News Notice: Correcting the misleading ‘that’ panel) (National Highway)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here