मोहली येथील खरेदी केलेले करोडो रुपयांचे धान्य अवकाळी पावसाने भिजले

333

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २० : तालुक्यातील मोहली येथील आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीने खरेदी केलेले धान्य खुल्या वातावरणात मोकळ्या जागेत उघड्यावर ठेवलेले असताना काल १९ मार्च ला अचानक आलेल्या वादळी पावसाने धान्य भिजले. गोडावून अभावी उघड्यावर खरेदी करून पटांगणात मेनकापड ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या धानाची झल्लिवरील ताडपत्री उडाली त्यामुळे धान्य उघड्यावर पडले आणि पावसाने भिजल्याने धान्य किती सुरक्षित आहेत या बाबत संस्थेची पोल खोलली.
लाखो रुपयांची नुकसान झाल्याने याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
धानोरा तालुक्यातील काही संस्थाकडे गोडावून आहेत पण ते धान्याने भरलेले आहेत. उरलेले धान संस्थेच्या पटांगणात उघड्यावर ठेवलेले आहेत. त्या धानावर अनेक लोकांची चोरटी नजर असते. काही संस्था कडे कोणत्याही पद्धतीचे गोडावून नाही त्याचे संपूर्ण धान्य मोकळ्या जागेत फक्त ताडपत्री झाकुन ठेवलेल्या आहेत.
मात्र काल १९ मार्च २०२४ रात्रोला ला रांगी, मोहली परिसरात जोरदार वादळी अवकाळी पाऊस पडल्याने याची झळ मोहली केंद्राला बसली. मोहली येथिल धान खरेदी हंगाम २०२३-२४ मधे २११००.८० क्विटल धान्य खरेदी केले. आणी पावसाने भिजल्याने भविष्यात खराब होनाऱ्या धान्याची जबाबदारी कोण सोसनार असा प्रश्न लोक विचारत आहेत.
आधारभूत धान खरेदी योजना आदिवासी उपयोजन क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ एजंट म्हणून स्थानिक सहकारी संस्थामार्फत राबविली जाते. या खरिप हंगामात मोहली येथील सेवा सहकारी संस्थेने २११००.८० क्विटल धान्याची खरेदी केली. संस्थेकडे कोणत्याही प्रकारचे गोडावुन नसल्याने फक्त ताडपत्री झाकुने ठेवले असताना काल अचानक झालेल्या वादळी पावसाने ताडपत्रीचे तिनं तेरा वाजले. ताडपत्रि फाटली, उडाली आणि धान्य पावसाने भिजले. महामंडळ कडून धानाची उचल होण्यास विलंब होत आहे हे खरे आहे. पण धान्य उचलतपर्यंत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संस्थेची असते. कालच्या पावसाने धान्य किती सुरक्षित आहेत हे दाखवून दिले. संस्थेने पाहिजे त्या प्रमाणात काळजी न घेतल्याने धान्य ओले झाल्याचे स्पष्ट दिसुन येते.
उचल होण्यापूर्वी ऊनाने धान्य सुकतात, वादळ उडतात,
उंदिर खातात, घुस पोखरून नासधूस करते यामुळे टूट येते याचा नाहक भुर्दंड संस्थेला पडते त्यामुळे संस्था अडचणीत येत असतात. यातच भर अवकाळी पावसाची. तालुक्यातील कोणतीही संस्था स्थापनेपासून फायद्यात नसुन सर्वच तोट्यात दिसुन येतात. यामुळे पुन्हा संस्थेचे फावत असुन धान्य खराब झाल्याचे दाखवले जाते. यावर वेळीच कारवाई होने आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here