राज्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद

359

– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे, बीडचे पालकमंत्री तर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर, ठाण्याचं पालकमंत्रिपद
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : राज्यात महायुतीची सरकार स्थापन होऊन मंत्रिपद आणि खाते वाटपही करण्यात आले मात्र जिल्ह्यांचे पालकमंत्री हे अद्यापही ठरलेले नव्हते त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा कायम होता. कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र आता हा तिढा सुटला असून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पालकमंत्री व सह पालकमंत्री यांची यादी जाहीर केली आहे.
पालकमंत्री पद वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचे, गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे, धुळ्याचे पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आले, हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम, संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. तर उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.राज्यात महायुतीची सरकार स्थापन होऊन मंत्रिपद आणि खाते वाटपही करण्यात आले मात्र जिल्ह्यांचे पालकमंत्री हे अद्यापही ठरलेले नव्हते त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा कायम होता. कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र आता हा तिढा सुटला असून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पालकमंत्री व सह पालकमंत्री यांची यादी जाहीर केली आहे.
पालकमंत्री पद वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचे, गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे, धुळ्याचे पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आले, हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम, संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. तर उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.
पालकमंत्री यादी महाराष्ट्र.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here