– ग्रामपंचायत रांगी ने पोलिसात दिली तक्रार
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ९ जुलै : तालुक्यातील रांगी ते निमगाव रस्तावर पाल नाला आहे. याच नाल्यावर मागिल वर्षी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. याच बंधाऱ्याचे लोखंडी पल्ले अज्ञात चोराने पळविल्या ने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. तर नळ योजनेची वाताहत होनार असल्याची ओरड सुरू असुन अज्ञात व्यक्ति विरोधात धानोरा पोलीस स्टेशन ला ग्रामपंचायत रांगीने तक्रार दाखल केली आहे.
नव्यानेच बांधकाम केलेला हा बंधारा शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचा आहे. बंधाऱ्यात पल्ले टाकून बंद केल्याने पाणी पातळीत वाढ तर होतेच त्या सोबत आजुबाजुच्या शेतकऱ्यांना येथिल पाणी पिक घेण्यास मदत होते. जनावरांना उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी मदत होते.
रांगी गावाला नळाद्वारे पाणी पुरवठा करणारी विहिर याच बंधाऱ्याला लागुनच बांधली आहे. जेने करुन पाणी पातळीत वाढ होवुन गावाला नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा होईल.
त्यामुळे गावकऱ्यांच्या तोंड चे पाणी पळविनारा व्यक्ती कोण?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तो अज्ञात चोर इथेच थांबला नाही तर विहीरीवरील मोटारी ला दिलेले कनेक्शन चे वायर सुद्धा पळविल्या ने गावाला पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत राहावे लागत आहे. विहिरीचे कनेक्शन मोटारीला जोडलेला असून या मोटारीपासून जोडलेल्या कनेक्शन चा वायर चोरीला गेला तसेच बंधाऱ्यांचे प्लेट हे सुद्धा अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने सदर घटनेची तक्रार धानोरा पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेली असून संबंधित प्रकरणाचे चौकशी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत नळाला पाणी येणार नसल्याचे ग्रामपंचायतीने कळवलेले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना प्रश्न निर्माण होत आहे की प्रकरण आठ दिवस जर लंपास राहिला तर बिना पाण्याविना काढावे लागणार त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी होईल कधी आणि चौकशी झाल्यानंतर याचा वायरिंग कनेक्शन लावून नळाला पाणीपुरवठा होईल कधी यासाठी रांगेतील ग्रामवासियांना वाट बघावे लागेल. मात्र सदर अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. रांगीमध्ये अशा चोरीच्या घटना नेहमीच होत असतात आणि हे भुरटे चोर असल्याने सदर चोराला वचक बसणे आवश्यक असल्याने याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.