– अमिर्झा येथील लाडक्या बहिणीच्या मेळाव्यात आमदार डॉ. देवराव होळी यांची महाविकास आघाडीवर टीका
The गडविश्व
गडचिरोली , दि. ०४ : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत असताना सरकारच्या मंत्र्यांनीच राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये खंडणी वसुली करून राज्याला भ्रष्टाचाराच्या खाईत ढकलण्याचे काम केले, त्यासाठी ते जेलमध्ये सुद्धा जाऊन आले आता मात्र तेच महाविकास आघाडीचे नेते जनतेला भूलथापा देऊन महायुती सरकारने केलेल्या चांगल्या कामांची बदनामी करून पुन्हा सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही भ्रष्टाचारी नेत्यांची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये यांच्यापासून लाडक्या बहिणींनी सावध राहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी अमिर्झा येथील लाडक्या बहिणींच्या मेळाव्या प्रसंगी केले.
यावेळी मंचावर तालुक्याचे माजी अध्यक्ष राम रतन गोहणे, पंचायत समिती माजी सभापती मारोतराव इचोडकर, अमिर्झाच्या सरपंच सोनाली नागपूरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते भास्कर नागपूरे, ग्रामपंचायत सदस्य अजय नागापुरे, निनाद खेवले, सुनील आयतुलवार, मेघा दोडके, जगदीश ठाकरे, बबनराव सूर्यवंशी, काळबांधे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी अमिर्झा परिसरातील विविध विकास कामांची आमदार देवराव होळी यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.