नवेगाव येथील विक्रेत्यांचे दारूअड्डे उध्वस्त

134

The गडविश्व
गडचिरोली, २४ जानेवारी : धानोरा तालुक्यातील नवेगाव येथील नदीलगतच्या परिसरात शोधमोहीम राबवून दारू अड्डे उध्वस्त केल्याची संयुक्ती कृती गडचिरोली व धानोरा मुक्तिपथ तालुका चमूच्या मदतीने संबधित गाव संघटन सद्स्यांनी केली.
धानोरा तालुक्यातील व गडचिरोली तालुक्यातील सीमावर्ती भागात वसलेल्या नवेगाव येथे अवैध दारूविक्री केली जाते. या गावातील विक्रेते दुर्गम भाग असल्याने नदीलगतच्या परिसरात हातभट्टी लावून दारू गाळतात व जिल्हामुख्यालयासह परिसरातील विविध किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करतात. याबाबतची माहिती मिळताच गडचिरोली व धानोरा मुक्तिपथ तालुका चमूने गावसंघटनेच्या मदतीने अहिंसक कृती करण्याचे नियोजन केले.
माहितीच्या आधारे गावसंघटन सदस्य व मुक्तिपथ चमूने नदी लगतच्या परिसरात शोधमोहीम राबविली असता, ठिकठिकाणी हातभट्टी सुरु असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दारू गाळण्यासाठी टाकलेला मोहफुलाचा सडवा व साहित्य निदर्शनास आले. घटनास्थळावरील विक्रेत्यांचे दारू अड्डे उध्वस्त करीत १५० लिटर मोहफुलाची दारू, मोहफुलाचा सडवा व दारू गाळण्याचे साहित्य असा जवळपास ५ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Cricket) (Earthquake) (Shubman Gill) PSG) (IND vs NZ 3rd ODI) (Rohit Sharma)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here