The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : हिंसेची वाट सोडून दांपत्याने आत्मसमर्पण करून शेती करीत होते मात्र हे खटकल्याने नक्षल्यांनी आत्मसमर्पित नक्षल्याची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातुन हत्या केल्याची घटना भामरागड तालुक्यातील आरेवाडा ते हिद्दुर मार्गावर २६ जुलै च्या मध्यरात्री घडली. जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे असे हत्या करण्यात आलेल्या आत्मसमर्पित नक्षलीचे नाव आहे.
गडचिरोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे व त्याची पत्नी रासो ऊर्फ देवे झुरु पुंगाटी हे दोघे २००७ पासुन भामरागड दलममध्ये सदस्य म्हणुन काम करीत होते. नक्षल्यांच्या तकलादु आणि खोटया क्रांतीची या दोघांना कल्पना आल्याने दोघांनी एकत्रीतपणे ०७ जुलै २०१७ रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आणि हिंसेचा मार्ग सोडुन स्वत:च्या प्रगतीचा मार्ग स्विकारला होता. हे दाम्पत्य नक्षल्यांच्या हिंसेचा मार्ग सोडुन शांततेचा मार्ग स्विकारत शेती करून आयुष्य जगत होते. मात्र काल २५ जुलै २०२४ ते २६ जुलै २०१४ च्या मध्यरात्री नक्षल्यांनी जग्गु गावडे ची आरेवाडा ते हिद्दुर रोडवरील PHC नजीक पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन हत्या केली. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नक्षली पुन्हा एकदा डोके वर काढून हिंसक कारवाया करीत असल्याचे दिसून येत आहे .
सदर हत्येप्रकरणी पोलीस स्टेशन भामरागड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच भामरागड परिसरात नक्षल विरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले असल्याचे कळते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolilocalnews #naxal #murder)