गाव तिथे वाचनालय निर्माण होणे काळाची गरज : खासदार डॉ.नामदेव किरसान

22

– खासदार डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते देलनवाडी येथे अभ्यासिकेचे लोकार्पण
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे आदर्श फाउंडेशन च्या वतीने सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
मोबाईल सोशल मीडिया च्या काळात तरुण पिढीचा वेळ चुकीच्या गोष्टीसाठी खर्ची होत असून तरुणांना सोशल मीडिया चे वेळ लागले आहे, तरुनांचा वेळ सत्कामी खर्ची करण्याकरीता त्यांच्यामध्ये वाचणाची गोडी निर्माण करावी लागेल आणि त्यासाठी गाव तिथे वाचनालय संकल्पना रुजवून गावागावात अभ्यासिका निर्माण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी यावेळी केले. तर महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी अभ्यासिकेच्या माध्यमातून चांगले अधिकारी घडून फक्त आपल्या गावाचाच नाही तर जिल्ह्याचाही नाव लौकिक करणारे अधिकारी घडावे अशी इच्छा व्यक्त केली.
या उदघाट्न सोहळ्यास तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे, सरपंच देलनवाडी प्रियंकाताई कुमरे, माजी  सरपंच रामनंदन गेडाम, उपसरपंच देलनवाडी त्रिलोकजी गावतुरे,विजयजी ठवरे, प्रदीपजी बोळणे, उपसरपंच उराडी राधेश्याम दडमल, रत्नाकर धाईत, व्ही.डी.  बावणकर, दिगेश्वर धाईत, जांभळे साहेब सह इतर मान्यवर गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here