२९ वर पोहचला चकमकीतील ठार झालेल्या नक्षल्यांचा आकडा ; गडचिरोली पोलीस सतर्क

3330

-२५-२५ लाख रुपये बक्षिस असलेल्या नक्षलींचा समावेश
The गडविश्व
कांकेर, दि. १६ : लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील माड परिसरात आज १६ एप्रिल रोजी दुपारी पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत संध्याकाळपर्यंत १८ नक्षली ठार झाल्याची माहिती होती मात्र आता ठार झालेल्या नक्षलींचा आकडा वाढला असून तो आता २९ वर पोहचला आहे. ठार झालेल्या नक्षलीमध्ये २५-२५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर असलेल्या डीव्हीसी दर्जाचे शंकर राव आणि ललिता मडावी यांचा समावेश आहे. तर या चकमकीत ३ जवान जखमी झाले असून त्यात बीएसएफचे निरीक्षक रमेश चौधरीसह २ डीआरजीच्या जवानांचा समावेश आहे. या चकामकीने गडचिरोली पोलीसही सतर्क झाले आहेत.
कांकेर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नक्षली हालचाली सुरू असल्याची माहिती पोलीस दलास मिळाली होती. त्या अनुषंगाने जवान आज १६ एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यातील छोटाबेटिया-माड परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपाच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. सुमारे काही तास चाललेल्या या चकमकीत तब्बल २९ नक्षली ठार झाले. जवानांनी नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून 5 एके-47 व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानल्या जात आहे.

गडचिरोली पोलीस सतर्क

कांकेर जिल्हा हा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा
सीमेलगत आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभेकरिता १९ एप्रिल ला निवडणूक पार पडत आहे. गडचिरोली पोलीसही निवडणुकीकरिता सज्ज झाले आहे. अतिसंवेदनशील भागात वायूसनेच्या हेलिकॉप्टर च्या सहायाने बूथ कर्मचारी पोहचविले जात आहे. अशातच कांकेर जिल्ह्यातील माड परिसरात आज झालेल्या चकमकीत तब्बल २९ नक्षली जवानांनी ठार केल्याने गडचिरोली जिल्हा समेलगत नक्षली सक्रिय असल्याचे दिसून आल्याने गडचिरोली पोलीसही सतर्क झाले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #cgnews #kanker #mad #abujhamad #abuzamad )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here