कायद्याचा आधार घेऊन मुक्तीपथ गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृती करावी

337

– आरमोरीतील १२ गावातील सदस्यांना ‘कायदा पुस्तिका’ भेट
The गडविश्व
गडचिरोली, ९ डिसेंबर : अवैध दारू व तंबाकू विरोधात कृती करण्यासाठी कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे आरमोरी तालुक्यातील १२ गावातील गाव संघटनेच्या सदस्यांना ‘कायदा पुस्तिका’ भेट देण्यात आली. सोबतच बैठकीच्या माध्यमातून कायद्याचा आधार घेऊन दारू व तंबाखूमुक्त गाव निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.
अवैध दारू व तंबाखू विरोधात लढा देण्यासाठी सुरु असलेल्या मुक्तीपथ अभियानात प्रमुख सहभाग हा जनतेचा आहे. त्यामुळे गाव संघटनेच्या सदस्यांना दारू व तंबाखूवर रोख लावण्यासाठी कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी गाव संघटनेच्या सदस्यांना कायदा पुस्तिकेचे वाटप केले जात आहे. गाव संघटनेच्या सदस्यांना दारूबंदीच्या प्रमुख कलम व कायदे, पेसा कायदा १९९६, ग्रामपंचायत अधिनियम नुसार गावात दारूविक्रीबंदी अधिनियम, सुगंधित तंबाखू, खर्रा, गुटखा बंदी कायदा- २०१२, अल्पवयीन मुलांसाठी संरक्षण कायदा – २०१५, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ कोटपा (COTPA), महाराष्ट्र राज्य अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ कलम ६ नुसार, साथरोग प्रतिबंध कायदा आदी कायद्यांची विस्तृत अशी माहिती या पुस्तिकेत आहे.
आरमोरी तालुक्यातील किटाळी, अरसोडा, कोरेगाव, वानरचूआ, वडधा, देलनवाडी, परसवाडी, भाकरोंडी, डोंगरगाव, ठाणेगाव, सुर्यडोंगरी, मोहझरी या 12 गावांमध्ये बैठकीचे आयोजन करून गावातून दारू व तंबाखू हद्दपार करण्यासाठी कोणत्या कायद्याचा कसा वापर करायचा याबद्दलची माहिती देण्यात आली. सोबतच सदर कायदा पुस्तिका गाव संघटनेच्या सदस्यांना देण्यात आली. सदर कायद्याची माहिती मुक्तिपथचे तालुका प्रतिनिधी विनोद कोहपरे यांनी समजावून सांगितले. यावेळी स्पार्क अभ्यासक्रम कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here