The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : तालुक्यातील आंबेटोला येथील दारूविक्री बंदीसाठी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली लोकांनीच पुढाकार घेत आपल्या गावाला अवैध दारूविक्रीमुक्त केले. यासाठी गाव संघटना व ग्रामस्थांनी अहिसंक कृतीसह विविध उपाययोजना केल्या. आता १५ वर्षांपासून हे गाव अवैध दारूविक्रीमुक्त गाव म्हणून नावारूपास आले आहे.
गडचिरोली तालुक्यातील आंबेटोला हे गाव जिल्हा मुख्यालयापासून १४ किलोमिटर अंतरावर आहे. या गावाची लोकसंख्या ८५७ आहे. या गावात पूर्वी दारू विक्रेते ३५ ते ४० संख्येने होते. मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने गावातील आरोग्य, आर्थिक नुकसान, मारामारी, चोरी , युवकांचे वाढलेले व्यसन , नवरा बायकोचे दारू पिउन भांडण आदी समस्या निर्माण झाले होते. त्यामुळे संन २००५ मध्ये गावाने पुढाकार घेऊन दारू विक्री बंद करण्यासाठी दारू बंदीचा ठराव घेतला. दारू विक्रेत्याला नोटीस देण्यात आले. काही दारू विक्रेते मुजोर असल्याने त्यांचे दारूचे अड्डे उध्वस्त करण्यात आले. गाव संघटनेचे वेगवेगळे दारू बंदीसाठी कृती कार्यक्रम करू दारू विक्रत्याना सडो की पडो करून सोडले. त्यामुळे आंबेटोला येथील दारू बंदी झाली.
दारूबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी गाव संघटनेने सात्यत ठेवल्याने १० वर्ष दारू बंद होती. त्यानंतर गावात एक दोन विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरु केला. त्यामुळे २०१६ मध्ये मुक्तीपथ संघटन तयार करून दारू बंद करण्यासाठी लढा उभा केला. या माध्यमातून दारू विक्रेत्यांवर कार्यवाही केली आणि लपून चोरून दारू विक्री बंद झाली. या गावात दारू बंद असल्याने आरोग्य, आर्थिक नुकसान कमी झाले आहे. शांतता व सुव्यवस्था टिकून आहे. या गावाने विजयस्तंभ उभारून दारूबंदीचा विजयोस्तव साजरा केला आहे. परिसरातील इतर गावातील दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थ विजयस्तंभाच्या माध्यमातून जाणीव जागृती करत आहे. गावांनी केले तर दारू बंदी शक्य आहे. ही बाब आंबेटोला गावांनी स्पष्ट करून दाखविली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )