दारूमुळे गमावलेला आनंद, पिणे बंद केल्यावर अनुभवास मिळाला

124

– दारू पिणे बंद केलेल्या २५ रुग्ण मित्रांचा सन्मान
The गडविश्व
गडचिरोली, १२ जानेवारी : मुक्तीपथ अंतर्गत गावपातळी व तालुका क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेऊन मागील १ ते २ वर्षापासून दारूपिणे बंद असलेल्या सिरोंचा तालुक्यातील २५ रुग्णमित्रांचा मुक्तीपथतर्फे सिरोंचा तालुका कार्यालय येथे सन्मान करण्यात आला. दारू पिणे अधिक काळ बंद राहावे, रुग्णमित्रांचे मनोबल अधिक वाढावे व कायम टिकून राहावे त्यांच्या सारखेच इतर त्यांचे व्यसनी मित्रांनी ह्या उपचाराचा लाभ घ्यावा, इत्यादी हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आला.
दारू पिणे बंद करण्यासाठी सिरोंचा येथील तालुका व गाव पातळी क्लिनिकच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांनी उपचार घेतला आहे. ज्या रुग्णांनी नियमितपणे उपचार घेऊन दारु पिणे सद्यस्थितीत बंद केले अशा रुग्णमित्रांचा सन्मान कायर्क्रम करण्यात आला. मुक्तीपथचे संचालक तपोजेय मुखर्जी, सर्चचे सहसंचालक तुषार खोरगडे यांच्या हस्ते शेला व पुष्पगुच्छ देऊन २५ रुग्ण मित्रांचा सन्मान करण्यात आला व नविन वर्षाच्या शुभेच्छासह मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान रुग्णमित्र व कुटुंबीयांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात सिरोंचा शहरासह नगरम, रामांजापूर, मंडलापुर, जानमपल्ली व जानमपल्ली चेक, आदीमुत्तापूर, नर्सिहाखापल्ली येथील दारुचे व्यसन सोडलेले व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मुक्तीपथ तालुका संघटक सुनीता भगत, समुपदेशक पुजाताई येल्लूरकर, प्रेरक शंकर गग्गूरी , स्पार्क कार्यकर्ता साईराम सेनिगरपू यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व प्रस्तावना पूजाताई येल्लूरकर यांनी केली.

‌रुग्णमित्र व कुटुंबियांचे मनोगत

दारूमुळे गमावलेला आनंद परत अनुभवास मिळाला – रुग्णमित्र

माझा मुलगा मला मुक्तिपथ क्लिनिकला घेऊन आला त्याच दिवशी ठरवलं कि, व्यसन सोडायचं आहे त्यानंतर क्लिनिकला नियमित येऊन पूर्ण उपचार घेतला. उपचारा दरम्यान माझे आरोग्य सुधारले आयुष्यभर, मी दारू मुळे जे गमावलं तो आनंद ह्या दोन वर्षात कुटुंबासोबत मी अनुभवले.

नियमित उपचार घेतल्याने तब्बेतीत सुधारणा : रुग्णमित्र

कधी कधी मित्रा सोबत सहज घेणारी दारू हळू हळू वाढत गेली आणि शरीरावर परिणाम होत गेला. जेवण होत नव्हते, कामात लक्ष लागत नव्हतं, कुठल्या गोष्टी नीट लक्षात राहत नव्हत्या अशा परिस्थितीत मुक्तिपथ क्लिनिकला उपचार सुरू केला. माझी तब्बेत सुधारायला लागली व आज नियमित काम करू लागलो.

दारुचे व्यसन सुटू शकते : रुग्णमित्र

खूपदा विचार करून दारूचे व्यसन सोडणे कठीण वाटत होते पण गावात शिबिर झाले व त्या शिबिरात ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या तेव्हा पासून स्वतःवर एक विश्वास बसला की नाही माझी पण दारू सुटू शकते. आज २ वर्ष झाले दारूला परत हात लावला नाही.

दारू सुटल्याने झाली पैशाची बचत : रुग्णमित्राची पत्नी

माझे पती दारू पीत होते पण मला कळत नव्हते की मी काय करून ह्यांची दारू सोडवू. मुक्तिपथ सिरोंचा संघटककडून क्लिनिक ची माहिती मिळाली आणि माझे पती उपचारासाठी आले. आज दारू सोडून जो पैसा त्यानी वाचवला त्यातून माझ्यासाठी सोन्याचे कानातले दागिना गिफ्ट म्हणून दिले.

दारू सुटल्यानी इज्जत परत मिळाली : रुग्णमित्र

आधी माझे नातेवाईक, सासरचे लोक म्हणायचे ” वो क्या मड्डीमार उसको मत बुलाना” आज तेच लोक आदरानी कार्यक्रमात बोलावतात. जी इज्जत दारू पिऊन गमावली ती दारू सुटल्यानी परत मिळाली.

पैशाची मोठी बचत : रुग्णमित्र

रोज ४०० रू कमावले की त्यातले २०० रू दारूत खर्च होत होते आज तेच पैसे गाडग्यात जमा केल्याने २०, ३० हजार बचत करता आले. दारुचे व्यसन सोडून गुंतले सुखी संसारात.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Veera Simha Reddy) (Swami Vivekananda Birthday) (HBSE Date Sheet 2023) (PAK vs NZ) (Golden Globes 2023) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here