कोरची तालुक्यात हिवतापाचा कहर ; चिमुकलीच्या मृत्युने खळबळ

746

– कोटगूल परिसरात होत आहे रुग्णांची वाढ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : जिल्ह्यात हिवतापाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून आता कोरची तालुक्यात हिवतपाचा कहर पहावयास मिळत आहे. तालुक्यातील नऊ वर्षीय आरती करणसाय कुंजाम नामक चिमुकलीचा हिवतापाचे मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे.
कोरची तालुक्यातील कोटगूल परिसरात मागील काही दिवसांपासून हिवतापाचा कहर सुरू असून अद्यापही थांबलेला नाही. दरम्यान आलोंडी येथील आरतीला ताप येत असल्याने तिला ३१ मे रोजी कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिची मलेरिया चाचणी पॉझिटीव्ह आली. यावेळी डॉक्टरांनी उपचार मे मात्र प्रकृती खालावल्याने तिला कोरचीला रेफर करण्यात आले. मात्र कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयातून रुग्णांना अनेकदा गडचिरोलीला रेफर करण्यात येत असल्याचे माहीत असताना पालकाने तिला वासळी येथील खासगी डॉक्टरकडे पुढील उपचारासाठी घेऊन गेले. तरीसुद्धा प्रकृतीत सुधारणा न होता ३ जूनला आरतीचा मृत्यू झाला.
कोटगूल परिसरात हिवतापाच्या आजाराने अनेक नागरिक बेजारले असून
मागील दोन महिन्यांत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर यापूर्वी कोटगूलपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील गोडरी येथील एकाच कुटुंबातील करिश्मा नैताम (वय ६) व प्रमोद नैताम (वय ४) या दोन चिमुकल्या भावंडांचा हिवतापाने मृत्यू झाला. व त्यानंतर लेकुरबोडी येथील रामबाई गावडे ह्या महिलेचा १७ एप्रिलला मृत्यू झाला. तर आता पुन्हा जून महिन्यात सुरुवातीलाच चिमुकलीचा मृत्यू झाल्याने एकूणच जिल्ह्यातील आरोग्य व्यवेस्थेचे धिंडवडे निघाले असून आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. सदर घटनेने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटर वर असल्याचे दिसून येत असून विविध समस्यांनी ही ग्रासलेलीही दिसून येत आहे.

(#thegdv #thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #gadchirolinews #crimenews #Afghanistan vs New Zealand #Sri Lanka vs Bangladesh
#Ramoji Rao #Best Friend Day #England Football #Alexander Zverev #Canada vs Ireland #Namibia vs Scotland #Gullak #korchi #maleriya)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here