– वाहतुकीची झाली कोंडी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २७ : तालुक्यातील रांगी येथून निमगावला जाणारा रस्ताच महापुरात वाहून गेल्याने या मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून सध्या तरी या मार्गाने तलावाचे रुप धारण केले असुन निमगाव गावात जायचे कसे ? गावात जायला रस्ता नसल्याने वाहन गावात ने आन करायची मोठी अडचण निर्माण झाल्याने वाहन काढायचे कसे ? असा प्रश्न गावकरी आणि वाहनधारक विचारत आहेत.
आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे काम बंदच पडले आहे. शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून सतत पडलेल्या पावसामुळे रांगी परिसरात महापुर आला. याच महापुरात रांगी ते निमगाव जाणारा रस्ता वामन शिडाम व राजेंद्र शिडामा यांच्या शेतालगतचा पुर्ण रस्ता वाहुन गेल्याने भलामोठा भगदाड पडलेला आहे. दैनीक कामासाठी गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, येथुन रांगीला दररोज ये-जा करावे लागते. रस्त्याच्या दुराअवस्थेमुळे गावाचा संपर्क तुटलेल्या आहे.निमगाव मासरगाटा येथील नागरिकांना दररोज कार्यालयीन, बँक, व्यापारी, आठवडी बाजार व खाजगी कामाकरीता लोक दररोज जिव मुठीत घेऊन प्रवास करतात. रांगी ते निमगाव येतील अंतर ३ कि.मी. असुन या तिन्ही किलोमीटर अंतरावर महापुरात पाणीच पाणी होते. तिन दिवस गाव संपर्कक्षेत्रा बाहेर होता. या महापुराने बळीराजाचे कंबरडे मोडले. शेतीचे मोठे नुकसान झाले. गावात आता कोणतेच वाहन जावू शकत नाही. शासन जिथे पुलाचे बांधकाम पाहिजे नेमके तेथील नाल्यावर बांधकाम करीत नाही याचमुळे गावाचा विकास रखडलेला दिसुन येते. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे संबंधित विभागाची पोलखोल केली हे मात्र विशेष. केलेले रस्त्याचे बांधकाम किती मजबुत आहे याचा अंदाजही आता कळत आहे. निमगावात प्रवेश करण्याचे दोन्ही मार्ग बंद पडलेले आहेत. बोरी मार्गावर भलामोठा रस्ता पोखरल्याने यामार्गे सुद्धा निमगाव ला वाहनाने जाणे शक्य नाही. २३०० लोकसंख्या असलेल्या या गावाची परिस्थिती अतिशय वाईट आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन वाहून गेलेला रस्ता अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन मोठ्या खड्ड्याचे बांधकाम करून रस्ता सुरळीत करून द्यावे.
– पुरुष्षोतम राजगडे
सामाजिक कार्यकर्ते निमगाव
(#thegdv #thegadvisvha #gadchirolinews #gadchirolilocalnews)